आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त बाल कल्याण केंद्र आणि जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन च्या माध्यमातून महिलांसाठी दिनांक 10 जुन पासून 14 जून 2025 मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कसब्यातील बाल कल्याण केंद्राच्या शाळेमध्ये सकाळी ६. ते ७. वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. या शिबिराला बारामतीतील प्रसिद्ध आयुर्वेद व योग तज्ज्ञ डॉ निलेश महाजन व डॉ भक्ती महाजन हे महिलांना योगासन प्राणायामाचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे कसबा परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन बाल कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ अनिल मोकाशी यांनी केले आहे.
कुटुंबातील रोजचे कार्य करीत असतांना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. महिलांमध्ये सध्या PCOD , पाळीच्या तक्रारी, थायरॉईड चे आजार वाढत चालले आहे , त्यासोबत संधिवात, मान दुखी, कंबर दुखी, केश गळती, शारीरिक मानसिक थकवा असे आजार वाढत चालले आहेत. या आजारांच्या उपचार स्वरूप योगसाधना प्रभावी आहे. त्याचे प्रशिक्षण देण्यासाठीच या योग्य शिबिराचे आयोजन केल्याची माहिती, डॉ भक्ती महाजन यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी २ फोटो आणि आधार कार्ड ची झेरॉक्स आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी ९६६५८२३१०३ या नंबर वर फोन करावा. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त महिलांसाठी मोफत योग शिबीर
*दिनांक:* 10 जुन 2025 ते 14 जून 2025
*स्थळ:* बाल कल्याण केंद्र शाळा, विठ्ठल प्लाझाच्या मागे, कसबा, बारामती
*वेळ:* सकाळी 6.30am to 7.30am
*महिलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त योगासने,प्राणायाम,ध्यान यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण.*
*PCOD, पाळीच्या तक्रारी, कंबर दुःखी, पाठदुखी, मानदुखी, गुडघे दुःखी, निद्रानाश, केश गळती यावर उपयोगी अशा यौगिक क्रियांचे मार्गदर्शन*
*प्रमुख मार्गदर्शक:*
*डॉ निलेश महाजन*
आयुर्वेद व योगोपचार तज्ञ
PhD योगा
*डॉ भक्ती महाजन*
*संचालक:* योग महाविद्यालय, बारामती