योगशास्त्रात संशोधनाची आयुर्वेद विद्यार्थ्यांना संधी : डॉ निलेश महाजन

                                       

19 June 2025 : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात योग प्रात्यक्षिक व प्रबोधनपर व्याख्यनाचे आयोजन केले होते. सुमारे २०० पेक्षा अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. बारामतीतील आयुर्वेद व योग तज्ज्ञ डॉ निलेश महाजन  शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल काळे यांनी विद्यार्थ्यांना योग भविष्यातील संधी याविषयी मार्गदर्शन केले.    

                                       

 भारतीय योगशास्त्र जगाला दिलेली एक देणगी आहे , त्यातील क्रियांचा मानवी शरीरावर सकारत्मक परिणाम पाहावयास मिळतात. योगासने, प्राणायाम , शुद्धिक्रिया आणि ध्यान या क्रियांचे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणाम यावर संशोधन करण्यास खूप वाव आहे. आयुर्वेद व योग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. त्यामुळे आयुर्वेद शास्त्राचा वापर करीत असताना परिपूर्ण निरामय जीवनासाठी योग आत्मसाद करून रुग्णांना याचा फायदा मिळून देण्याची क्षमता आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे या क्रिया स्वतः करून त्यावर संशोधन करावे असे मत योग व आयुर्वेद तज्ञ डॉ निलेश महाजन यांनी व्यक्त केले. 


योगातील विविध क्रियांचा शरीरक्रियात्मक दृष्ट्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांची माहिती त्यांनी प्रात्यक्षिकांसह दिली. योगासन प्रात्यक्षिकामध्ये सूक्ष्म व्यायाम,  योगासने , प्राणायाम , ध्यान यांचे अनुभवजन्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. 

                                       

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ अर्चना इंचेकर (विभाग प्रमुख - शरीरक्रिया विज्ञान), डॉ सारिका अष्टेकर, डॉ श्रीनिवास बोबडे , डॉ सुरज भुंजे, डॉ क्षितीज गर्गे यांनी सहकार्य केले.  कार्यक्रमाला डॉ रफिक मुजावर, डॉ मनीषा पाटील, डॉ कल्याणी शेवाळकर, डॉ तबस्सुम पानसरे, डॉ अरविंद तुमराम,डॉ अंजुम शेख, डॉ विक्रांत इंगळे,डॉ प्रियांका केंगले,डॉ विजय पाटील उपस्थित होते.