गेल्या पाच वर्षांपासून १००० पेक्षा अधिक विद्यार्थी बारामती, पुणे आणि महाराष्ट्र भरातून योग शिकण्यासाठी येत आहेत. अनेक विद्यार्थी आता स्वत: योग शिकण्यासाठी सज्ज झाले आहेत. तेही बारामतीमध्ये विविध ठिकाणी योग वर्ग चालवीत आहेत, त्या निमित्ताने अनेक महिला आणि नागरिकांना योग , आरोग्याचे धडे मिळत आहेत. त्यांना विविध रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. डॉ निलेश महाजन आणि डॉ भक्ती महाजन हे दाम्पत्य त्यांना नियमित मार्गदर्शन करीत असतात.
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ च्या निमित्ताने योग महाविद्यालायाच्या अनेक विद्यार्थ्यांना डॉ निलेश महाजन आणि डॉ भक्ती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिनाच्या कार्यक्रमासाठी योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी विविध शाळांमध्ये, कंपन्यांमध्ये एकूण ३००० विद्यार्थ्यांना याद्वारे योगाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल, बाल कल्याण केंद्र प्राथमिक शाळा, मेडिकोज गिल्ड , शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठानचे पिंपळी व न्यू इंग्लिश माध्यम शाळा, मराठी मध्यम शाळा, धों. आ सताव माध्यमिक शाळा, कवी मोरोपंत माध्यमिक शाळा, टेक्सटाईल पार्क , म ए सो इंग्रजी माध्यम शाळा, शारदा निकेतन , चंदूकाका सराफ ज्वेलर्स, बारामती अग्रो, अचीवर्स इंग्रजी माध्यम शाळा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इत्यादी अस्थापनांमध्ये स्वतः डॉ निलेश महाजन , डॉ भक्ती महाजन यांनी व विविध विद्यार्थ्यांद्वारे योगाचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन करण्यात आले.
योग महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉ श्वेता जाधव, डॉ मृण्मयी भेडसगावकर, डॉ दीपाली माने, अश्विनी वायसे , सोनाली ठवरे, पल्लवी बनकर, धन्वंतरी पाटील, धनश्री तोडकर, सुरेखा कराळे, रेखा भगत, नंदिनी खोमणे, रुपाली डाखोरे, योगिता जामदार, सुषमा रायते, हीनाकौसर अत्तार, इंदुमती गायकवाड, मीना कानडे, रुपाली कोठावळे, अर्चना पोमणे, अनुराधा कुलकर्णी, नीलिमा झारगड, प्रज्ञा माने, मंजुषा शिंगाडे, नयना काळोखे, आशा पाटील सचिन रणमोडे यांनी विविध ठिकाणी योगाचे मार्गदर्शन केले.