जीवन विद्या योग आयुर्वेद फौंडेशन व बाल कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ चे औचित्य साधून बारामतीतील कसबा येथील बाल कल्याण केंद्र येथे दिनांक १८ जून २०२५ ते २१ जून २०२५ पर्यंत सकाळी ६.३० ते ७.३० वाजता पाच दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ४० नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदविला.
योग तज्ञ डॉ निलेश महाजन यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने या शिबिराचे आयोजन केले गेले. योग आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवितो. गरज आहे आपण नियमित , दीर्घ कालावधी पर्यंत सजगतेने योगाभ्यास करण्याची. आणि याच साठी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून आम्ही या शिबिराचे आयोजन केल्याची माहिती डॉ भक्ती महाजन यांनी दिली.
योग आपल्या शरीराची ,मनाची ओळख आपल्याला करून देतो. अनेक व्याधी आपण याद्वारे नियंत्रित करू शकतो. योगासने करणे म्हणजे केवळ शरीर वाकविणे नसते , तर त्यावर नियंत्रण मिळविणे, सजगतेने त्याकडे पाहणे, श्वास नियम करणे या क्रियाचा सराव शरीराच्या सूक्ष्म भागावर परिणाम करणारा ठरतो, अनेक शारीरिक क्रीयांचे कार्य सुधारण्यास मदत करणारा ठरतो त्यामुळे सर्वांनी योगाभ्यास शिकणे आवश्यक असल्याचे मत बाल कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ अनिल मोकाशी यांनी यावेळी व्यक्त केले.
योग दिनाच्या दिवशी बाल कल्याण केंद्राच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा योग सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी योग शिक्षिका डॉ श्वेता जाधव आणि रेखा नरके यांनी सुमारे १०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूक्ष्म व्यायाम , प्रार्थना, सर्व स्थितीतील योगासने, प्राणायाम , आणि ध्यान यांचे मार्गदर्शन यामध्ये करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल कल्याण केंद्राचे अंकिता मोकाशी, गौतम मोकाशी, संदीप मुळीक, भुजबळ काका तसेच योग महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉ श्वेता जाधव , रेखा नरके, सुनंदा बागल, हीना अत्तार, पल्लवी बनकर, रेखा गेजगे, सिद्धी महाजन यांनी सहकार्य केले.