दिल्लीच्या लाल किल्यावर ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे आणि मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला उपस्थित राहणे हा आमच्यासाठी अविस्मरणीय सोहळा होता. अतिशय योग्य नियोजन आणि कडक सुरक्षा व्यवस्था यामधून हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अनुभवायला मिळणे हि आमच्या सारख्या अनेक जनासाठी पर्वणीच होती. राज घाटावर दर्शन घेतल्यानंतर मा पंतप्रधान हे यांचे लाल किल्ल्यावर आगमन होताच लाल किल्ल्याच्या समोरील पूर्ण मैदानावरील वातावरण हर्षोल्हासित झाले.
त्यानंतर मा पंतप्रधान यांनी भारतीय झेंडा फडकावला. भारतीय आर्मी तर्फे राष्ट्रगीताचे संगीतीय (Instrumental) गाण करण्यात आले आणि भारतीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या लष्करी हेलिकॉप्टर द्वारे सर्व उपस्थितांवर पुष्प वर्षाव करण्यात आला. त्यावेळी मन भारावून गेले. सलग २ तास उभे राहून भाषण केल्यानंतर पुढे एवढे अंतर चालून आमच्या सर्वांच्या ठिकाणी येणे हे आमच्यासाठी एक पर्वणीच होती. सुरक्षेच्या कारणास्तव खूप जवळ जायाला मिळणे नाही परंतु त्यांना जवळून बघितले यामध्येही अनेकांना आनंद मिळाला.
१५ ऑगस्टच्या कार्यक्रमानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान, राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान , योग प्रमाणीकरण मंडळ याठिकाणी सर्व योग शिक्षकांना नेण्यात आले. तेथे योग, आयुर्वेद मध्ये चालविण्यात येणाऱ्या विविध कोर्सेसची माहिती देण्यात आली. पुढे योग, आयुर्वेदातील भविष्यातील संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. एक प्रमाणित योग संस्था म्हणून आयुर्वेद व योगशास्त्राचे मूळ सिद्धातानुसार प्रचार आणि प्रसार करणे महत्वाचे आहे. योग शास्त्र व आयुर्वेद शास्त्र भारतीय संस्कृतीचा हा मूळ गाभा आहे, भारताची धरोहर आहे. त्याचा शास्त्रशुद्ध प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यासह अनेक विषयांवर चर्चा व विचार मंथन झाले
दुसऱ्या दिवशी दिल्लीतील नवीन आणि जुन्या पंतप्रधान म्युझियम ला भेट देण्यात आली.




























.jpg)
.jpg)
%20Sharmila%20Pawar%20.jpeg)


.jpg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)



.jpeg)

.jpg)
.jpg)