योग महाविद्यालया तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त ध्यानयोग सत्राचे आयोजन
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त योग महाविद्यालय बारामती मध्ये मोफत ध्यानयोग सत्राचे व योगाचार्य डॉ निलेश महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. योगाचार्य डॉ निलेश महाजन यांनी प्राणधारणा,मंत्र ध्यान आणि अंतर त्राटक यांच्या साहाय्याने उपस्थितांकडून ध्यानाचे प्रात्यक्षिक करून घेतले.
स्वामी विवेकानंद यांच्याकडे असीम दूरदृष्टी होती, त्यांनी युवांना कसे वागावे, कसे स्वतःला विकसित करायचे असे अनेक मुद्दे संगीतलेले आहेत. आजच्या युवाशक्ती ने स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या हातून महान कार्य घडू शकते ऋषीमुनींनी त्यांच्या अपार ध्यान शक्तीच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्या पर्यंत पोहचवले आहे.मन हे चंचल असते ,त्यावर नियंत्रण मिळवणे आणि त्याला आपला मित्र करून घेणे हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे. असे डॉ निलेश महाजन यांनी नमूद केले.
आजच्या युवकांनी स्वामी विवेकानंद व मातोश्री जिजाऊ यांच्या विचारांना आदर्श मानून जीवनाला, समाजाला दिशा द्यावी. आपली संस्कृती ही आदर्श आहे. स्वामीजींच्या विचारांनी भारतीय संस्कृती ची ओळख जगाला करून दिली, त्यांचे धर्म, प्रार्थना आणि ज्ञान यांचे विवेचन त्यांनी जगासमोर योग्य प्रकारे मांडले.आजचे युवक हे उद्याचा देश घडवणार आहेत ,त्यामुळे स्वामीजींनी युवकांना सांगितलेल्या व्यक्तिमत्व विकासाच्या विचारांचा अवलंब केला पाहिजे , आणि त्यांना अपेक्षित युवक होऊन स्वतःला ,समाजाला व देशाला दिशा द्यावी असे मत डॉ भक्ती महाजन यांनी सांगितले.
योग महाविद्यालयाचे डॉ श्वेता जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्र संचालन केले तसेच कार्यक्रम यश्वी करण्यासाठी सचिन रणमोडे, हर्षदा मईड यांनी सहकार्य केले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

