भारतच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लालकिल्ल्यावर मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे बारामतीतील डॉ निलेश महाजन व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ भक्ती महाजन यांना दिल्लीमध्ये होणाऱ्या येत्या स्वातंत्र्यदिनीच्या समारंभामध्ये उपस्थित राहण्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले होते.
१३ ऑगस्ट तारखे पासून ते १७ ऑगस्ट २०२५ तारखे पर्यंत त्यांना या समारंभामध्ये आमंत्रित केले होते. भारत भरातून योगाक्षेत्रात कार्य करणाऱ्या १०० योग शिक्षकांना, महाराष्ट्रातून जवळपास २० जणांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच विविध क्षेत्रात विशेष व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या पाच हजार जणांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. दिल्लीच्या लाल किल्यावर ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे आणि मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला उपस्थित राहणे हा आमच्यासाठी अविस्मरणीय सोहळा होता. अतिशय योग्य नियोजन आणि कडक सुरक्षा व्यवस्था यामधून हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अनुभवायला मिळणे हि आमच्या सारख्या अनेक जनासाठी पर्वणीच होती. राज घाटावर दर्शन घेतल्यानंतर मा पंतप्रधान हे यांचे लाल किल्ल्यावर आगमन होताच लाल किल्ल्याच्या समोरील पूर्ण मैदानावरील वातावरण हर्षोल्हासित झाले.
त्यानंतर मा पंतप्रधान यांनी भारतीय झेंडा फडकावला. भारतीय आर्मी तर्फे राष्ट्रगीताचे संगीतीय (Instrumental) गाण करण्यात आले आणि भारतीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या लष्करी हेलिकॉप्टर द्वारे सर्व उपस्थितांवर पुष्प वर्षाव करण्यात आला. त्यावेळी मन भारावून गेले. सलग २ तास उभे राहून भाषण केल्यानंतर पुढे एवढे अंतर चालून आमच्या सर्वांच्या ठिकाणी येणे हे आमच्यासाठी एक पर्वणीच होती. सुरक्षेच्या कारणास्तव खूप जवळ जायाला मिळणे नाही परंतु त्यांना जवळून बघितले यामध्येही अनेकांना आनंद मिळाला.
१५ ऑगस्टच्या कार्यक्रमानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान, राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान , योग प्रमाणीकरण मंडळ याठिकाणी सर्व योग शिक्षकांना नेण्यात आले. तेथे योग, आयुर्वेद मध्ये चालविण्यात येणाऱ्या विविध कोर्सेसची माहिती देण्यात आली. पुढे योग, आयुर्वेदातील भविष्यातील संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. एक प्रमाणित योग संस्था म्हणून आयुर्वेद व योगशास्त्राचे मूळ सिद्धातानुसार प्रचार आणि प्रसार करणे महत्वाचे आहे. योग शास्त्र व आयुर्वेद शास्त्र भारतीय संस्कृतीचा हा मूळ गाभा आहे, भारताची धरोहर आहे. त्याचा शास्त्रशुद्ध प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यासह अनेक विषयांवर चर्चा व विचार मंथन झाले
दुसऱ्या दिवशी दिल्लीतील नवीन आणि जुन्या पंतप्रधान म्युझियम ला भेट देण्यात आली.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने, योग प्रमाणीकरण मंडळाने अथक परिश्रमाने आमच्यासाठी नियोजन पूर्वक हा कार्यक्रम घडवून आणला, आणि आम्हाला एक अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही सर्व मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, आयुष मंत्रालायचे मंत्री श्री प्रतापराव जाधव, सचिव डॉ राजेश कोटेचा, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे निर्देशक डॉ काशिनाथ समगंडी, योग प्रमाणीकरण मंडळा चे प्रमुख सल्लागार श्री एन के कंसारा, मुदित शर्मा, आशा बेंटूर, शरद मुंडे, हर्ष , पूजा अधिकारी, विकी मान, श्वेता डोग्रा आणि सर्व टीम चे मनापासून आभारी आहोत.
Dr. Nilesh Mahajan and his wife from Baramati were special guests at the Independence Day celebrations at the Red Fort
A grand function was organized at the Red Fort in the presence of Hon'ble Prime Minister Shri Narendra Modi on the occasion of India's 79th Independence Day. In this function, Dr. Nilesh Mahajan and his learned wife Dr. Bhakti Mahajan from Baramati were invited as special guests by the Ministry of AYUSH, Government of India, to attend the Independence Day celebrations held in Delhi.
They were invited to this function from 13th August to 17th August 2025. 100 yoga teachers working in the field of yoga from all over India and about 20 people from Maharashtra were invited. Also, five thousand people who are doing special and innovative work in various fields were invited to this function.
Attending the flag hoisting ceremony at the Red Fort in Delhi and attending the speech of Hon'ble Prime Minister Shri Narendra Modi was an unforgettable event for us. It was a pleasure for many people like us to experience this Independence Day celebration with very proper planning and tight security arrangements. After visiting Raj Ghat, as soon as the Prime Minister arrived at the Red Fort, the atmosphere on the entire ground in front of the Red Fort was joyful.
Then the Prime Minister hoisted the Indian flag. The Indian Army sang the National Anthem instrumentally and saluted the Indian flag. A military helicopter of the Indian Air Force showered flowers on all those present. At that time, my heart was overwhelmed.
It was a pleasure for us to see the Prime Minister Shri Narendra Modi, after standing and speaking for 2 hours, walking such a distance and coming to the place of the specially invited guests. Due to security reasons, we were not allowed to go very close, but many people were happy to see him up close.
After the program on 15 August, all the yoga teachers were taken to the Morarji Desai National Yoga Institute, National Ayurveda Institute, Yoga Certification Board. Information was given about various courses being run in Yoga and Ayurveda. Further, guidance was given on future opportunities in Yoga and Ayurveda. As a certified yoga institute, it is important to promote and disseminate Ayurveda and Yoga Shastra according to its original principles. Yoga Shastra and Ayurveda Shastra are the core of Indian culture, the heritage of India. It is our responsibility to promote and disseminate it in a scriptural manner. Discussions and brainstorming were held on many topics including this.On the next day, a visit was made to the new and old Prime Minister Museum in Delhi.
The Ministry of AYUSH, Government of India, Yoga Certification Board worked tirelessly to organize this event for us, and we are deeply grateful to all of you, Prime Minister Shri Narendra Modi, Minister of AYUSH Shri Prataprao Jadhav, Secretary Dr. Rajesh Kotecha, Director of Morarji Desai National Institute of Yoga Dr. Kashinath Samgandi, Principal Advisor of Yoga Certification Board Shri N. K. Kansara, Mudit Sharma, Asha Bentur, Sharad Munde, Harsh, Pooja Adhikari, Vicky Mann, Shweta Dogra and the entire team for giving us the opportunity to witness an unforgettable event.