11 Aug 2025 : Dr Nilesh Mahajan delivered a Lecture in Sharadchandraji Pawar College of Engineering & technology, Someshwarnagar, Tal: Baramati. On Women empowerment and Skill development through yoga. Near about 150 girls were participated in the lecture.
सोमेश्वर नगर येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शरदचंद्र पवार अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजित व गुणवत्ता वृद्धी कार्यक्रमांतर्गत ही कार्यशाळा नुकतीच पार पडली उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय देवकर यांनी केले या कार्यशाळेत आयुर्वेद व उपचारात्मक योग तज्ञ डॉ निलेश महाजन यांनी महिला सक्षमीकरणासाठी योग आणि आरोग्याचे महत्त्व या विषयावरती महत्त्व स्पष्ट केले. आज कालच्या युगामध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. त्यामुळे महिलांचा सबलीकरण होणं गरजेचं आहे. यासाठी आपलं शारीरिक आणि मानसिक बल वाढवणे गरजेचे आहे यासाठी योग आयुर्वेद व भारतीय प्राचीन शास्त्रांचा वापर करणे गरजेचे आहे याच सोबत महिला सबलीकरण जेवढे आवश्यक आहे तेवढेच संस्कृतीच्या कोणत्या मध्ये या सबलीकरणला ठेवणे गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपप्राचार्य डॉक्टर शरद गावडे प्राध्यापक सलोनी शहा प्राध्यापक श्रद्धा भगत प्राध्यापक शिल्पा शेरटे प्राध्यापक आकांक्षा गायकवाड प्राध्यापक वैष्णवी कलाटे प्राध्यापक वनिता खोमणे व प्राध्यापक प्रतीक्षा गावडे उपस्थित होते आयोजनासाठी भरत सचिव भरत खोमणे यांचे सहकार्य दाबले संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप उपाध्यक्ष मिलिंद कांबळे संचालक आनंदकुमार होळकर यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या प्राध्यापक स्मिता पाटील यांनी प्रास्ताविक केले व प्राध्यापक प्रतिमा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक कावेरी धुमाळ यांनी आभार मानले तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित चंद्रकांत सोनवणे यांनी आत्मरक्षण तंत्र व तो आयकॉन दो व कराटेचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले