गत २५ वर्षापासून आयुर्वेदाशी नाळ जोडलेला चरक आयुर्वेद ग्रुप :वैद्य निलेश महाजन


बारामती दि २३ : केंद्र सरकार ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आयुर्वद दिनाचे औचित्य साधून दि १७ ते २३ सप्टेंबर २०२५ या कालावधी मध्ये डॉ भोइटेज चरक आयुर्वेद, सातारा यांच्या तर्फे चरक आयुर्वेद च्या सर्व शाखांमध्ये आयुर्वेद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निबंध स्पर्धा, लांब केश स्पर्धा, चित्रकला स्पर्धा  अशा विविध स्पर्धा तसेच आरोग्य कीर्तन उपक्रमाचे आयोजन केले गेले होते.  त्या निमित्ताने बारामती शाखे मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे वितरण समारंभ बारामतीतील प्रसिद्ध योग व आयुर्वेद तज्ञ वैद्य निलेश महाजन , वैद्य भक्ती महाजन,वैद्य सारिका अष्टेकर यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला, सर्व स्पर्धकांना चरक आयुर्वेदच्या वतीने प्रशस्तिपत्रक , पारितोषिक व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. 

आयुर्वेद हे आपल्या आयुष्यासाठी आवश्यक असे शास्त्र आहे. जसे आपण नवीन गाडी घेतो तेव्हा त्यासोबत एक माहिती पत्रक देतात , गाडी उत्तम रीतीने चालण्यासाठी काय गोष्टी करणे गरजेच्या आहेत, त्या कधी कराव्या , कशा कराव्या याबद्दलची सविस्तर माहिती त्यामध्ये असते. तसेच मनुष्य जीवनाचे आयुर्वेद हे माहिती पत्रक आहे. दीर्घकाल निरोगी राहून आपल्या चारही पुरुषार्थांची प्राप्ती कशी करावी यासाठीचे हे शास्त्र आहे. केवळ उपचारच नाही तर आपण आजारी पडू नये यासाठीचे नियम यामध्ये वर्णन केले आहेत. असे वैद्य निलेश महाजन यांनी सांगितले. चरक आयुर्वेदाच्या माध्यमातून लहान मुलामध्ये तसेच समाजामध्ये आयुर्वेद डीनच्या निमित्ताने घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे सामान्य जन आयुर्वेद चिकित्सा पद्धतीच्या जवळ येतील, त्याबद्दल चे गैरसमज दूर व्हयला मदत होणार आहे. त्यामुळे चरक आयुर्वेदाच्या बारामती शाखेच्या संचालक वैद्य प्रिया भोईटे व त्यांच्या पूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन. 

या वेळी इतर प्रमुख पाहुण्यांनी आणि स्पर्धकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, लोकांना दर्जेदार आयुर्वेद औषधें मिळण्यासाठी चरक ग्रुप नेहमी प्रयत्न करत असतो असे प्रतिपादन वैद्यांनी केले , या वेळी चरक आयुर्वेद बारामती टीम मधील वैद्य प्रिया भोईटे ,वैद्य विक्रांत इंगळे ,वैद्य शिवानी गाडे तसेच वैद्य ऐश्वर्या शिंदे, व्यवस्थापक किशोर सावंत उपस्थित होते. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. 

आयुर्वेद सप्ताहातील  विजेत्या स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे, निबंध लेखन स्पर्धा,- सौ गायत्री खिलारे (प्रथम क्रमांक)   डॉ चैतन्य कुलकर्णी (द्वितीय क्रमांक ), चित्रकला स्पर्धा- लहान गट- रुचिता मते (प्रथम क्रमांक), आयुष कदम (द्वितीय क्रमांक) , मोठा गट-तन्मयी झुरुंगे(प्रथम क्रमांक),  करिष्मा ताडे (द्वितीय क्रमांक) ,  लांब केश संभार स्पर्धा  - सौ प्रज्ञा शेटे(प्रथम क्रमांक),  सौ वर्षा बालगुडे (द्वितीय क्रमांक ) 









योग महाविद्यालयात सामूहिक अथर्वशीर्ष पठण व व्याख्यान संपन्न

                                         

योग महाविद्यालयात सामूहिक अथर्वशीर्ष पठण व व्याख्यान संपन्न

गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी डॉ निलेश महाजन यांच्या मार्गदर्शनानाखाली योग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. त्यानंतर अथर्वशीर्ष, त्याचा अर्थ आणि योगशास्त्रातील योग संकल्पना याबाबत डॉ निलेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

गणपती ही बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते. या बुद्धीचा अंकुश आपल्या इंद्रियांवर, मनावर, अहंकारावर असणे आवश्यक आहे. त्यासाठी अथर्वशीर्ष पठण करणे आवश्यक आहेत. आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावा या दृष्टीने या अथर्वशीर्ष पठण आणि त्याचा अर्थ या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे डॉ भक्ती महाजन यांनी सांगितले. 


गणेश उत्सव म्हणजे गणेशाची आराधना करण्याचा महोत्सव यावेळी आपण सर्वजण गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणरायाची आराधना करत असतो. हे करत असताना अथर्वशीर्षाचे पठण करणे अत्यंत उपयुक्त आहे.   नुसतेच पाठांतर करून नाही तर त्याचा अर्थही समजून घेणे गरजेचे आहे. अनेकांना याचा सूक्ष्म अर्थ माहीत नसतो. यामध्ये अनेक वेद, दर्शन शास्त्र यातील संदर्भ आहेत,ज्या आपल्या जीवनामध्ये उपयोगी आहेत. 

                                        

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ श्वेता जाधव सचिन रणमोडे सुरेखा कराळे, योग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

                                       

*Group Atharvashirsha recitation and lecture completed at Yoga College*

On the occasion of Ganesh Festival, on September 5, 2025, the students of Yoga College recited the group Atharvashirsha Stotra under the guidance of Dr. Nilesh Mahajan. After that, Dr. Nilesh Mahajan informed the students about Atharvashirsha, its meaning and the concepts in Yoga Shastra contained therein

Ganesh Utsav is a festival of worshiping Lord Ganesha. During this time, we all worship Ganesha by installing the Lord Ganesh idol. While doing this, reciting Atharvashirsha is very useful. It is necessary to understand its meaning and not just recite it. Many people do not know its subtle meaning. It has many references from Vedas and philosophy, which are useful in our lives. Ganapati is known as the god of wisdom (Buddhi). This wisdom must have control on our senses, mind, and ego. For this, it is necessary to recite Atharvashirsha. It is important to use it in our lives, so this Atharvashirsha recitation and its meaning has been organized with the aim of making the students understand its meaning, said Dr. Bhakti Mahajan.

Dr. Shweta Jadhav, Sachin Ranmode, Surekha Karale collaborated to make the program a success.




'हॅप्पी स्ट्रीट' या उपक्रमामध्ये योग विषयी जनजागृती



 'हॅप्पी स्ट्रीट' या उपक्रमामध्ये योग विषयी जनजागृती


मा खा सौ सुनेत्रावाहिनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया तर्फे बारामती मध्ये दिनांक 26 जुलै व 27 जुलै रोजी हॅप्पी स्ट्रीट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये विविध प्रकारचे  खेळ ,  कलाकृती , आरोग्य विषयी, योगा, डान्स व खाऊ गल्ली यांचा समावेश होता. बारामतीकरांना हि एक पर्वणीच होती. विविध प्रकरच्या कलाकृती जसे माती काम, शिल्पकला, योगा, चित्रकला यांचे प्रशिक्षण व माहिती या निमित्ताने बारामतीकरांना मिळाली. नेहमी प्रमाणेच उत्साही आणि काहीतरी नवीन करण्यासाठी उत्सुक बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला , आणि पेन्सील चौक ते गदिमा सभागृहाचा रस्ता लोकांनी ओसंडून वाहत राहिला. स्थानिक प्रशासन ,पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन,  एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया च्या सदस्यांनी अतिशय नियोजन पुर्वक हा हॅप्पी स्ट्रीट चा नाविन्य पूर्ण उपक्रम नियोजन पूर्वक  पार पडला. 

आरोग्य विषयक भागामध्ये बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फौन्डेशन, योग महाविद्यालय बारामती यांच्या माध्यमातून योग विषयक जनजागृती करण्यात आली. आपल्या आरोग्यासाठी योगसाधना, आयुर्वेद तत्वज्ञान कसे फायदेशीर आहे याची माहिती यावेळी देण्यात आली. हे करीत असतानाच लहान मुलांचा आणि मोठ्या माणसांचा सहभाग वाढवा म्हणून विविध प्रकारचे योगाचे आव्हाने (Yoga Challenge) देण्यात आले होते. जे हे आव्हाने पूर्ण करतील त्यांना एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया तर्फे वही , लहान मुलांचे गॉगल, चॉकलेट, जलनेती पॉट अशा प्रकारचे विविध बक्षिसे देण्यात आली. सूर्यनमस्कार, चक्रासन, हलासन , मत्स्यासन , वृश्चीकासन यासारखे आसने आव्हाने म्हणून देण्यात आली होती. यामध्ये बालचमुंसह लहान थोरांनी बक्षिसांची लयलूट केली. 

बारामतीतील प्रसिद्ध आयुर्वेद व योग तज्ञ डॉ निलेश महाजन यांनी सर्वाना आरोग्याविषयी माहिती दिली. योगासन, प्राणायाम , सुर्यनमस्कार , ध्यान यासारख्या पद्धती आपल्या शारीरिक , मानसिक आरोग्यावर कशा प्रकारे सकारात्मक परिणाम करितात याचे प्रात्यक्षिका सह प्रशिक्षण व माहिती दिली. सुमारे ४०० जणांनी यामध्ये सहभाग नोंदविला. सर्व उपक्रमांची माहिती आदरणीय मा खा सौ सुनेत्रावाहिनी अजितदादा पवार व श्री पार्थदादा पवार यांनी प्रत्यक्ष भेट देवून घेतली. काही निवडक सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. 

या अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे अधिकाधिक लोकांना आपल्या आरोग्याविषयी माहिती मिळते , आरोग्याविषयी सजग राहायला मदत होते. मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे. असे व्यासपीठ आमच्या सोबत इतरानांही एक सुवर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिल्ल्याबद्दल  मा खा सौ सुनेत्रावाहिनी अजितदादा पवार व  एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया च्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार , असे मत डॉ निलेश महाजन यांनी व्यक्त केले. 

योग आरोग्य याविषयी माहिती देणे आणि प्रात्याक्षिके करून दाखविणे यासाठी योग महाविद्यालयाचे विद्यार्थी,  श्वेता जाधव, धनश्री तोडकर, रेखा पगार, सुरेखा कराळे, सोनाली ठवरे, शिवानी काटकर, मीना कानडे , सुनंदा बागल, रोहिणी शिंदे, सचिन रणमोडे, निलेश रणदिवे तसेच नक्षत्र योग ग्रुप चे सर्व साधक यांनी सहकार्य केले 

Dr Mahajan Nilesh Delivered Lecture on Women empowerment and Skill development through Yoga

 11 Aug 2025 : Dr Nilesh Mahajan delivered a Lecture in Sharadchandraji Pawar College of Engineering & technology, Someshwarnagar, Tal: Baramati. On Women empowerment and Skill development through yoga. Near about 150 girls were participated in the lecture.

सोमेश्वर नगर येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शरदचंद्र पवार अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजित व गुणवत्ता वृद्धी कार्यक्रमांतर्गत ही कार्यशाळा नुकतीच पार पडली उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय देवकर यांनी केले या कार्यशाळेत आयुर्वेद व उपचारात्मक योग तज्ञ डॉ निलेश महाजन यांनी महिला सक्षमीकरणासाठी योग आणि आरोग्याचे महत्त्व या विषयावरती महत्त्व स्पष्ट केले. आज कालच्या युगामध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. त्यामुळे महिलांचा सबलीकरण होणं गरजेचं आहे. यासाठी आपलं शारीरिक आणि मानसिक बल वाढवणे गरजेचे आहे यासाठी योग आयुर्वेद व भारतीय प्राचीन शास्त्रांचा वापर करणे गरजेचे आहे याच सोबत महिला सबलीकरण जेवढे आवश्यक आहे तेवढेच संस्कृतीच्या कोणत्या मध्ये या सबलीकरणला ठेवणे गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपप्राचार्य डॉक्टर शरद गावडे प्राध्यापक सलोनी शहा प्राध्यापक श्रद्धा भगत प्राध्यापक शिल्पा शेरटे प्राध्यापक आकांक्षा गायकवाड प्राध्यापक वैष्णवी कलाटे प्राध्यापक वनिता खोमणे व प्राध्यापक प्रतीक्षा गावडे उपस्थित होते आयोजनासाठी भरत सचिव भरत खोमणे यांचे सहकार्य दाबले संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप उपाध्यक्ष मिलिंद कांबळे संचालक आनंदकुमार होळकर यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या प्राध्यापक स्मिता पाटील यांनी प्रास्ताविक केले व प्राध्यापक प्रतिमा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक कावेरी धुमाळ यांनी आभार मानले तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित चंद्रकांत सोनवणे यांनी आत्मरक्षण तंत्र व तो आयकॉन दो व कराटेचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले




A workshop on women empowerment and empowerment was organized at Sharad Chandra Pawar College of Engineering and Technology, run by Someshwar Shikshan Prasarak Mandal, Someshwar Nagar. The workshop was recently held under the quality enhancement program sponsored by Savitribai Phule Pune University. The inauguration was done by the Principal of the college, Dr. Sanjay Devkar. In this workshop, Ayurveda and therapeutic yoga expert Dr. Nilesh Mahajan explained the importance of yoga and health for women empowerment. In today's era, women are working shoulder to shoulder with men, so women need to be empowered. For this, it is necessary to increase our physical and mental strength. For this, it is necessary to use yoga, Ayurveda and ancient Indian sciences. Along with this, as much as women empowerment is necessary, it is also necessary to keep this empowerment in the context of culture, he also mentioned. On this occasion, Vice Principal Dr. Sharad Gawde, Professor Saloni Shah, Professor Shraddha Bhagat, Professor Shilpa Sherte, Professor Akanksha Gaikwad, Professor Vaishnavi Kalate, Professor Vanita Khomane and Professor Pratiksha Gawde were present. Bharat Secretary Bharat Khomane cooperated with the organization. President of the organization Purushottam Jagtap, Vice President Milind Kamble, Director Anand Kumar Holkar, wished the workshop well. Professor Smita Patil gave the introduction and Professor Pratima Gaikwad moderated the program. Professor Kaveri Dhumal expressed her vote of thanks. International trainer Ajit Chandrakant Sonawane demonstrated and guided the self-defense techniques and the icon do and karate.








योग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक

 


बारामती येथील योग महाविद्यालय मधील विद्यार्थी बिस्मिल्ला  शेख व रोहित चव्हाण यांना महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन संलग्नित तसेच भारतीय केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालय, बृहन महाराष्ट्र योग परिषद, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व क्रीडा परिषद महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त 6 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये अनुक्रमे  लेग बॅलेन्स व शयनस्थितीतील योगासन  प्रकारामध्ये प्रथम क्रमांकाने सुवर्णपदक पटकाविले. यामुळे पुढे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रोहित चव्हाण हे योगशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असून बिस्मिल्ला शेख या योग प्रमाणीकरण मंडळाचे प्रशिक्षण घेत  आहेत. या पूर्वीही त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये पदके पटकावली आहेत. सदर स्पर्धेसाठी त्यांना योग महाविद्यालय बारामतीचे संचालक डॉ. निलेश महाजन, डॉ. सौ.भक्ती महाजन, प्रो. प्राजक्ता देशपांडे  यांचे मार्गदर्शन लाभले.


Yoga College students win gold medals in state-level yoga competition

Bismilla Sheikh and Rohit Chavan, students of Yoga College in Baramati, won gold medals in the 6th Maharashtra State-level Yoga Competition affiliated to Maharashtra Yoga Sports Association and recognized by the Union Ministry of Youth and Sports of India, Brihan Maharashtra Yoga Parishad, Maharashtra Olympic Association and Sports Council Maharashtra Government, respectively, in the leg balance and supine yoga categories. Due to this, they have been selected for the upcoming national competition. Rohit Chavan is pursuing a postgraduate degree in yoga science and Bismilla Sheikh is undergoing training for Yoga Level 1 of the Yoga Certification Board. They has won medals in many competitions before this. For this competition, they received guidance from Dr. Nilesh Mahajan, Director of Yoga College Baramati, Dr. Mrs. Bhakti Mahajan, Prof. Prajakta Deshpande.