'हॅप्पी स्ट्रीट' या उपक्रमामध्ये योग विषयी जनजागृती
मा खा सौ सुनेत्रावाहिनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया तर्फे बारामती मध्ये दिनांक 26 जुलै व 27 जुलै रोजी हॅप्पी स्ट्रीट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध प्रकारचे खेळ , कलाकृती , आरोग्य विषयी, योगा, डान्स व खाऊ गल्ली यांचा समावेश होता. बारामतीकरांना हि एक पर्वणीच होती. विविध प्रकरच्या कलाकृती जसे माती काम, शिल्पकला, योगा, चित्रकला यांचे प्रशिक्षण व माहिती या निमित्ताने बारामतीकरांना मिळाली. नेहमी प्रमाणेच उत्साही आणि काहीतरी नवीन करण्यासाठी उत्सुक बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला , आणि पेन्सील चौक ते गदिमा सभागृहाचा रस्ता लोकांनी ओसंडून वाहत राहिला. स्थानिक प्रशासन ,पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया च्या सदस्यांनी अतिशय नियोजन पुर्वक हा हॅप्पी स्ट्रीट चा नाविन्य पूर्ण उपक्रम नियोजन पूर्वक पार पडला.
आरोग्य विषयक भागामध्ये बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फौन्डेशन, योग महाविद्यालय बारामती यांच्या माध्यमातून योग विषयक जनजागृती करण्यात आली. आपल्या आरोग्यासाठी योगसाधना, आयुर्वेद तत्वज्ञान कसे फायदेशीर आहे याची माहिती यावेळी देण्यात आली. हे करीत असतानाच लहान मुलांचा आणि मोठ्या माणसांचा सहभाग वाढवा म्हणून विविध प्रकारचे योगाचे आव्हाने (Yoga Challenge) देण्यात आले होते. जे हे आव्हाने पूर्ण करतील त्यांना एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया तर्फे वही , लहान मुलांचे गॉगल, चॉकलेट, जलनेती पॉट अशा प्रकारचे विविध बक्षिसे देण्यात आली. सूर्यनमस्कार, चक्रासन, हलासन , मत्स्यासन , वृश्चीकासन यासारखे आसने आव्हाने म्हणून देण्यात आली होती. यामध्ये बालचमुंसह लहान थोरांनी बक्षिसांची लयलूट केली.
बारामतीतील प्रसिद्ध आयुर्वेद व योग तज्ञ डॉ निलेश महाजन यांनी सर्वाना आरोग्याविषयी माहिती दिली. योगासन, प्राणायाम , सुर्यनमस्कार , ध्यान यासारख्या पद्धती आपल्या शारीरिक , मानसिक आरोग्यावर कशा प्रकारे सकारात्मक परिणाम करितात याचे प्रात्यक्षिका सह प्रशिक्षण व माहिती दिली. सुमारे ४०० जणांनी यामध्ये सहभाग नोंदविला. सर्व उपक्रमांची माहिती आदरणीय मा खा सौ सुनेत्रावाहिनी अजितदादा पवार व श्री पार्थदादा पवार यांनी प्रत्यक्ष भेट देवून घेतली. काही निवडक सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
या अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे अधिकाधिक लोकांना आपल्या आरोग्याविषयी माहिती मिळते , आरोग्याविषयी सजग राहायला मदत होते. मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे. असे व्यासपीठ आमच्या सोबत इतरानांही एक सुवर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिल्ल्याबद्दल मा खा सौ सुनेत्रावाहिनी अजितदादा पवार व एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया च्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार , असे मत डॉ निलेश महाजन यांनी व्यक्त केले.
योग आरोग्य याविषयी माहिती देणे आणि प्रात्याक्षिके करून दाखविणे यासाठी योग महाविद्यालयाचे विद्यार्थी, श्वेता जाधव, धनश्री तोडकर, रेखा पगार, सुरेखा कराळे, सोनाली ठवरे, शिवानी काटकर, मीना कानडे , सुनंदा बागल, रोहिणी शिंदे, सचिन रणमोडे, निलेश रणदिवे तसेच नक्षत्र योग ग्रुप चे सर्व साधक यांनी सहकार्य केले