आपल्याला आयुर्वेद , योग , निसर्गोपचार च्या आरोग्य क्षेत्रात करिअर करायचे आहे ? मग आपण हे कोर्सेस केलेच पाहिजेत

 

  भारत आणि विश्वामध्ये  योग,आयुर्वेद, निसर्गोपचार उपचार पद्धतीला मागणी वाढत आहे. या क्षेत्रात कार्य करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 101% रोजगाराच्या संधी असलेले विविध कोर्सेस तेही महाराष्ट्र सरकार आणि UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून करता येतात. बारामतीतील योग्य महाविद्यालय बारामती आपणासाठी खालील कोर्सेस चे दर्जेदार शिक्षण देणारे महाराष्ट्रातील नंबर एक चे महाविद्यालय आहे. आयुर्वेद, पंचकर्म , योग व निसर्गोपचार केंद्रामध्ये हे  कोर्सेस  केलेल्या मनुष्यबळाची सध्या नितांत आवश्यकता आहे. अगदी बारामती सारख्या ग्रामीण भागापासून ते पुण्या मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्येही याची मागणी आहे त्यामुळे आपण त्याची माहिती घेऊन प्रवेश निश्चित करावा.सध्या १५ जून २०२५ पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे  

प्रवेशासाठी संपर्क: 9665823103

योग, पंचकर्म व निसर्गोपचार महाविद्यालय, बारामती

१.डिप्लोमा इन योगा टीचर(1 वर्ष), पात्रता: 12 वी पास, शुल्क : 9100/-                

२.M.A. योगा(2 वर्ष), पात्रता: Any Graduate प्रवेश शुल्क: 18500/- प्रति वर्ष     

३. डिप्लोमा इन आयुर्वेदिक मसाज अँड पंचकर्म टेक्निशियन, 1 वर्ष, पात्रता: 12 वी पास, प्रवेश शुल्क: 20000/- 

४. डिप्लोमा इन आयुर्वेद पंचकर्म: 1 वर्ष , पात्रता: BAMS डॉक्टर/ वैद्य/इंटर्नशिप विद्यार्थी, शुल्क: 30000/- 

(BAMS नसलेल्यांसाठी कालावधी 2 वर्ष आणि शुल्क 30000/- प्रती वर्ष)          

योग महाविद्यालयाचे ब्रोशर, अभ्यासक्रम  आणि प्रवेश अर्जाच्या काही महत्वाच्या लिंक्स आहे त्यावरून अधिक माहिती करून घ्यावी                                                                                                                                        1) Information Brosher

https://www.pranyoga.org/brosher-for-courses 

2) Syllabus of Courses

https://www.pranyoga.org/syllabus

3) Apllication form for admissions

https://www.pranyoga.org/general-1


योग महाविद्यालयामध्ये आयुर्वेद , योग, निसर्गोपचार क्षेत्रात २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी पर्यंत अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स , प्रशिक्षक आहेत. आयुर्वेदातील पंचकर्म, योग चिकित्सा  व इतर उपचार पद्धतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळण्यासाठी उपचार केंद्र उपलब्ध आहे , जिथे आपणास प्रत्यक्ष  योग , पंचकर्म शिकता येणार आहे. प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि योगाचार्य डॉ निलेश महाजन हे या योग महाविद्यालयाचे संचालक आणि प्रधान चिकित्सक आहेत. त्यांच्या दूर दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आयुर्वेद, योग व निसर्गोपचाराची आवश्यकता ओळखून त्यांनी या कोर्सेस ची प्रशिक्षण संस्था सुरु केली आहे. 






योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांचे बाल योग संस्कार शिबिरात आरोग्य, अध्यात्म, भारतीय तत्वज्ञानाचे मार्गदर्शन

योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांचे बाल योग संस्कार शिबिरात आरोग्य, अध्यात्म, भारतीय तत्वज्ञानाचे मार्गदर्शन 

 उन्हाळी बाल योग संस्कार शिबिराची उत्साहात सांगता 

बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशनच्या मार्फत लहान मुलांसाठी दिनांक 2 मे ते 20मे पर्यंत आयोजित उन्हाळी बाल योग संस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला . जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित उन्हाळी शिबिरामध्ये एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी श्लोक पठण स्पर्धा, योगासन स्पर्धा घेण्यात आली. समारोप प्रसंगी शिबीर यशस्वी रित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एमआयडीसी बारामतीचे विभागीय आयुक्त हनुमंत पाटील, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, सुधीर पराडकर, प्रा अतुल भुजबळ  यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

                                        

 या शिबिरामध्ये विविध प्रगत योगासने, समंत्र सूर्यनमस्कार, मेंदूला चालना देण्यासाठीच्या यौगिक हालचाली,शंखवादन माहिती, विविध श्लोकपठण यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेबद्दल जागृती व्हावी व भाषा सहज बोलता यावी यासाठी संस्कृत संभाषण,  विविध मन्त्र , रामरक्षा पठण घेण्यात आले. योग महाविद्यालयाचे संचालक डॉ भक्ती महाजन , डॉ निलेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



आजच्या भौतिकवाद, चंगळवादाच्या युगामध्ये सर्वांचीच आणि विशेषता: तरुण वर्गाची आनंदाचा परिभाषा  बदलली आहे. त्यामुळे केवळ इंद्रिय तृप्ती, भौतिक गोष्टी मिळविण्यासाठीच प्रत्येकाची धडपड असते. त्यातूनच स्पर्धा, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, नैराश्य, तणाव, मानसिक समस्या निर्माण होत असते. त्यामुळेच लहान वयातच गुन्ह्यांचे प्रमाण आपणाला वाढलेले दिसते. लहान मुलांना जर आपण याबाबतची माहिती दिली, त्यांच्या शरीर, मन, इंद्रिये, बुद्धी यांचा साचेबद्ध ओळख करून दिली आणि आनंदाची संकल्पना हि केवळ भौतिक नसून, अध्यात्मिक पातळीवर हि आहे याची शिकवण दिली तर घर घरातून स्वामी विवेकानंद निर्माण होतील आणि समाज परिवर्तन घडेल. असे मत यावेळी आयुर्वेद व योग हॉस्पिटल चे प्रमुख डॉ निलेश महाजन यांनी व्यक्त केले.  

      आजचे मुले हे उद्याच्या भारताचे नागरिक आहेत. त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकास होणे सशक्त भारताच्या निर्माणसाठी आवश्यक आहे. या शिबिराच्या निमित्ताने त्यांच्या मध्ये आरोग्य विषयी, स्वतः मधील विविध गुणांविषयी, मानसिक व भावनिक जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही या शिबिराचे आयोजन आवश्यक आहे, असे मत हनुमंत पाटील यांनी व्यक्त केले. 

                                  

मुलांना शाळेतील अभ्यासा व्यतिरिक्तचे ज्ञान अध्यात्मिक पुस्तके, बोधकथा , महान पुरुषांचे चरित्र वाचन    यातून मिळविले पाहिजे. आम्ही मुलांना हे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक पालकांनी त्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. असे शिबिराच्या समन्वयक  डॉ भक्ती महाजन यांनी सांगितले.  

                                                          

   बारामती क्रीडा संकुल नेहमीच अशा चांगल्या विधायक कार्याला सहकार्य करीत असते. डॉ निलेश महाजन यांचा लहान मुलांवर संस्कार करण्याचा जो विचार आहे तो अगदी योग्य आहे. मनाचे संगोपन शिकविणे हि काळाची गरज आहे. असे मत तालुका क्रीडा अधिकारी श्री महेश चवले यांनी व्यक्त केले. 

                                            

 शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, अभिजित इंगुले , योग महाविद्यालायचे विद्यार्थी डॉ श्वेता जाधव, धनश्री तोडकर, सचिन रनमोडे, हिनाकौसर अत्तार, पल्लवी बनकर, सुनंदा बागल, अश्विनी वायसे, यांनी सहकार्य केले.

                                        

                                        










बारामतीत २ मे ते २० मे २०२५ पर्यंत बाल योग संस्कार शिबीराचे आयोजन

                            बारामतीत २ मे ते २० मे  २०२५ पर्यंत बाल योग संस्कार शिबीराचे आयोजन 

योगतज्ज्ञ निलेश महाजन देणार योग व भारतीय तत्वज्ञानाचे प्रशिक्षण 


बारामतीत बाल योग संस्कार शिबीराचे आयोजन 
योगतज्ज्ञ निलेश महाजन देणार योग व भारतीय तत्वज्ञानाचे प्रशिक्षण 

बारामतीतील आयुर्वेद व योग उपचार केंद्राचे प्रमुख डॉ निलेश महाजन यांच्या प्रेरणेने व जीवनविद्या योग्य आयुर्वेद फौंडेशन यांच्या माध्यमातून येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये २ मे ते २० मे  २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी ७. ३० ते ९ वाजेपर्यंत उन्हाळी बाल योग संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांना भारतीय तत्वज्ञान, योग, आयुर्वेद, अध्यात्माची ओळख व्हावी, आरोग्याविषयी जागरूकता वाढावी, शरीर, मन आणि अध्यात्मिक गोष्टी कळाव्यात यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याची माहिती तालुका क्रीडा अधिकारी श्री महेश चावले यांनी दिली . भगवत गीता,उपनिषद, योग, आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास असणारे प्रसिद्ध डॉ निलेश महाजन हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  या बाल योग संस्कार शिबिरामध्ये विविध योगासने, प्राणायाम,  मंत्रपठण, बोध कथा ,मेंदूची क्षमता विकसित करण्याचे व्यायाम, ध्यान , धारणा, अष्टांग योग याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुलांची प्रतिकार शक्ती, एकाग्रता, स्मरण शक्ती वाढविण्यासाठी, शारीरिक मानसिक सुदृढतेसाठी, कार्यक्षमता वाढीसाठी, उंची वाढण्यासाठी या प्रक्रियांचा उपयोग होणार आहे. प्रत्यक्ष सहभागी विद्यार्थ्याला विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी देणगी शुल्क ९९९ /- एवढे असणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी ९६६५८२३१०३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


डॉ निलेश महाजन प्रेरित आणि जीवनविद्या इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड आयुर्वेद संचालित

उन्हाळी योग संस्कार वर्ग (लहान मुलांसाठी)  (वय : 8 ते 16 वयापर्यंत)

या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या मुलांसाठी विशेष  योग संस्कार वर्ग

या योग वर्गामध्ये 
योगासने
सूर्यनमस्कार
श्लोक पठण
प्राणायाम
धारणा - ध्यान शिकविण्यात येणार आहे.

उपयुक्तता:
🧘🏻‍♂️लहान मुलांची प्रतिकार शक्ती एकाग्रता स्मरण शक्ती उंची वाढण्यासाठी 
🧘🏻‍♂️व्यक्तिमत्व विकासासाठी
🧘🏻‍♂️उच्चारण स्पष्ट होण्यासाठी
🧘🏻‍♂️स्वतः ची ओळख होण्यासाठी 
🧘🏻‍♀️बालकाच्या मानसिक व शारीरिक सुदृढतेसाठी 
🧘🏻‍♀️अष्टांग योगाचा परिपूर्ण अभ्यास 
 🧘🏻‍♀️धारणा ध्यान  पूर्व तयारी

वैशिष्ट्ये:
👉🏻योग वर्गासाठी प्रशस्त हॉल
👉🏻तज्ज्ञ प्रशिक्षक व मार्गदर्शक 
योग ही काळाची गरज आहे. 
👉🏻प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

कालावधी:  2 मे ते 20 मे 2025 पर्यंत

शुल्क :999/-

स्थळ : जिल्हा क्रीडा संकुल , देसाई इस्टेट ,बारामती

वेळ: सकाळी 7.30 ते 9.00 am

संपर्क :
प्रमुख मार्गदर्शक
डॉ निलेश महाजन
आयुर्वेद व योगोपचार तज्ज्ञ 
9665823103
डॉ भक्ती महाजन
आयुर्वेद व योगोपचार तज्ज्ञ



आयुर्वेद व योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांना PhD प्रदान

 

* आयुर्वेद व योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांना PhD प्रदान *



बारामतीतील प्रसिद्ध आयुर्वेद व योगतज्ञ डॉ. निलेश महाजन यांना योगशास्त्र विषयात त्यांनी केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे , भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष श्री चमू कृष्ण शास्त्री व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ हरेराम त्रिपाठी त्यांच्या हस्ते पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे. 


'कोविड 19 च्या संसर्गा पश्चात निर्माण होणाऱ्या लक्षणांवर यौगिक क्रियांची परिणामकारकता- एक चिकित्सक अध्ययन' हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. नागपूर येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये हा शोध प्रबंध सादर केला होता. कैवल्यधाम लोणावळा येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ नीता विलास गाडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. 

गेल्या 100 वर्षांपासून योगशास्त्रात संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कैवल्यधाम या संशोधन केंद्रातून पीएच.डी पदवी प्राप्त करणारे ते पहिले विद्यार्थी ठरले आहेत. त्यासाठी सचिव ओ.पी. तिवारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. कोरोनाच्या काळामध्ये अनेक नागरिकांना मोफत योग प्रशिक्षण दिले होते, ज्याचा सकारात्मक फायदा झाल्याचे निरीक्षण अनेकांनी सांगितले होते. 



मार्गदर्शक डॉ नीता गाडे यांच्या प्रोत्साहन, त्यांचा योग तत्वज्ञानाचा अभ्यास आणि सोबत संशोधक दृष्टिकोन यामुळे शोध निबंध परिपूर्ण झाल्याचे डॉ निलेश महाजन यांनी नमूद केले. विद्यापीठातील योग विभागाचे अधिष्ठता डॉ कलापिनी अगस्ती, डॉ पराग जोशी, डॉ मधुसूदन पेन्ना यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. कैवल्यधाम संचालित गोर्धनदास सेकसेरिया योग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ बंदिता सतपथी, डॉ निधीशकुमार यादव , PhD समन्वयक श्री संजय शेटे सर यांचे सहकार्य लाभले.  बारामतीतील डॉ अंजली खाडे, डॉ भक्ती महाजन, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ अनिल काळे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. 
योगप्रसार, शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी योगाच्या प्रभावी उपयोगांवर संशोधनपर अभ्यास, आणि योग आयुर्वेद प्रशिक्षणात असलेल्या अनुभवामुळे ते या क्षेत्रातील मान्यताप्राप्त तज्ज्ञ आहेत. गेल्या 15 वर्षांपासून डॉ निलेश महाजन हे जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून योग व आयुर्वेद शास्त्राचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. अनेक कार्यशाळा व  योग शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी 40000 पेक्षा अधिक लोकांना योगाचे मार्गदर्शन केले आहे. सुमारे 500 हुन अधिक विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत जे योगशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत.  
लोकांनी आयुर्वेद व योग साधना आपल्या दैनंदिन वापरामध्ये ठेवावी यासाठी ते अनेकांना मार्गदर्शन करीत असतात. योग आयुर्वेदाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळण्यासाठी त्यांनी बारामतीमध्ये पहिल्या योग महाविद्यालयाची स्थापना केली आहे. ज्यामध्ये बारामती, महाराष्ट्र व पूर्ण भारतातून विद्यार्थी योगाचे शिक्षण घेत आहेत. 
योग आयुर्वेदातील विविध सेमिनार, कार्यशाळा यामध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक शोधपत्रिकांमध्ये त्यांचे शोध निबंध , तसेच मासिके ,वृत्तपत्रातून त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.
बारामती व पंचक्रोशीतील नागरिकांना शास्त्रोक्त आयुर्वेद व योग उपचार देण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शन व प्रयत्नातून लवकरच सुसज्ज असे निवासी आयुर्वेद,निसर्गोपचार व योग उपचार व संशोधन केंद्र कार्यान्वित होणार आहे.


डॉ भक्ती महाजन यांचा लोकमत मीडिया ग्रुप तर्फे सन्मान

डॉ भक्ती महाजन यांचा लोकमत मीडिया ग्रुप तर्फे सन्मान 

महिला दिनाचे औचित्य साधत त्यांच्या आयुर्वेद, योग व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचे कौतुक 

          बारामतीतील सुप्रसिद्ध डॉ भक्ती महाजन यांना आयुर्वेद व योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकमत मिडिया ग्रुप चे संपादक श्री संजय आवटे यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले.  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामतीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना लोकमत मीडिया ग्रुप तर्फे सन्मानित करण्यात आले. लोकमत मीडिया ग्रुप चे चेअरमन डॉ विजय दर्डा यांची स्वाक्षरी व संदेश असलेल्या सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.   

         डॉ भक्ती महाजन हे गेल्या १५ वर्षांपासून बारामती मध्ये आयुर्वेद व योगोपचार तज्ज्ञ म्ह्णून कार्य करीत आहेत. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून त्या समाजकार्यामध्येही अग्रेसर असतात. योगशास्त्राच्या माध्यमातून महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्या त्यांना मदत करीत असतात. बारामतीतमध्ये प्रथमच सुरु झालेल्या योग महाविद्यालयाच्या त्या संचालक आहेत.  महिलांसाठी अनेक मोफत योग शिबिरांचे आयोजन त्यांनी केले आहे. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये त्यांचे शोध निबंध प्रकशित झाले आहेत. भारतीय तत्वज्ञानाची आवड असल्याने आयुर्वेदाच्या पदवी सोबतच त्यांनी योग आणि संस्कृत विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आधुनिक युगातील महिला घर सांभाळून, आता घरातील इतर कार्यानाही हातभार लावत आहेत. हे करीत असताना त्यांची जी ओढाताण होते त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. त्यासाठी सर्व महिलांनी योगसाधना करणे, योग तत्वज्ञान आत्मसाद करणे आणि व्यवहारामध्ये अमलात आणणे गरजेचे आहे असे त्यांचे मत आहे.      

लोकमत मिडिया ग्रुप चे बारामतीतील वरिष्ठ पत्रकार श्री प्रशांत ननावरे यांनी यासाठी सहकार्य केले. 





 

 ताणतणाव निवारणासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक

सोमेश्वरनगर मधील शरदचंद्र पवार इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलोंजि महाविद्यालयात ताणताणाव व्यवस्थापनावर व्याख्यान 
भावी इंजिनिअर विद्यार्थ्यांना डॉ महाजन यांचा मूलमंत्र

                                        


सोमेश्वरनगर मधील शरदचंद्र पवार इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलोंजि च्या विद्यार्थ्यांना 'ताणतणाव नियोजन आणि व्यक्तिमत्व विकास' या विषयावर बारामतीतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ निलेश महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. 


आजचे विद्यार्थी उद्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत, त्यामुळे विद्यार्थीदशेत आरोग्यपूर्ण चांगल्या सवयी आत्मसाद करणे आवश्यक आहे, त्यासाठी योग्य प्रमाणात आहार,झोप , योग्य व्यक्तींची संगत, नियमित योगासने प्राणायाम यांचा समावेश आपल्या दिनक्रमात केला पाहिजे.  

योग आपल्या शरीर आणि मनाचा समन्वय साधण्यासाठी मदत करतो. हा समन्वय  साधण्यासाठी श्वसन क्रिया, मेंदूची कार्यक्षमता वाढविणाऱ्या क्रिया, एकाग्र ध्यान प्रक्रिया यांचे प्रशिक्षण देण्यात आले. 
या  कार्यक्रमाला प्राचार्य हजारे एस के, प्राध्यापक धापटे एस एन ,बनकर एस जी उपस्थित होते. योग शिक्षक बनकर पी एस यांनी प्रास्ताविक केले, शिंदे पी जे यांनी आभार मानले. 




Dr Nilesh Mahajan's Stress Management training to Students of Government Ayurveda College, Baramati, Pune, Maharashtra, India, 413115
वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तणाव व्यवस्थापन शिकणे आवश्यक : डॉ निलेश महाजन 
बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात तणाव व्यवस्थापनावर व्याख्यान 

बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या विद्यमाने 'तणाव व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीतील आयुर्वेद व योगोपचार तज्ञ डॉ निलेश महाजन यांनी आयुर्वेदाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा ६५ जणांना तणाव म्हणजे काय, त्याचा शरीरावर होणार परिणाम, तणाव व्यवस्थापनासाठी योग प्रक्रिया, ध्यानाचे सोपे प्रकार यांचे धडे दिले. 
                                                                                                                                           
                                         
 आपल्या अपेक्षा आणि वास्तविकता यामधील फरक तणाव निर्माण करीत असतो, त्यामुळे यातील फरक कमी करण्याचे प्रयत्न म्हणजेच तणाव व्यवस्थापन होय. चुकीचे ज्ञान, अहंकार, इंद्रियांच्या मागे धावणे, द्वेष, लोभ या गोष्टी आपल्या अपेक्षा वाढवितात त्यामुळे तणावात भर पडते. योगाभ्यास , योग तत्वज्ञाना मुळे  शरीर , मन, इंद्रिय, बुद्धी यांसारख्या सूक्ष्म व अंतर्गत हालचाली आपल्याला नियंत्रित करता येतात आणि वास्तविकतेची जाणीव होते. यांचे व्यवस्थापन हे आपल्या पुढील यशस्वी आयुष्यासाठी आवश्यक आहे. वास्तविकता लक्षात येण्यासाठी दैनंदिन सराव, मेहनत, वेळेचे नियोजन, शिस्त अंगीकारणे गरजेचे आहे. ज्यामुळे तणाव कमी होती आणि मनुष्य आपल्या जीवनात यशस्वी होतो. असे डॉ निलेश महाजन यांनी सांगीतले.  

आपण वैद्यकीय चे विद्यार्थी असलो तरी एक माणूस म्ह्णून आपल्यावरही अप्रत्यक्ष तणावाचा परिणाम होत असतो, त्यामुळे तणाव व्यवस्थापनासाठी डॉ महाजन यांनी सांगितलेल्या योग क्रिया, ध्यान, मेंदूचा विकास करणारे व्यायाम सर्वानी आत्मसाद करावे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रशांत साळी यांनी सांगितले. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल काळे, डॉ सूर्यकांत रोकडे, डॉ प्रशांत साळी, डॉ क्षितिज गर्गे, डॉ सुरज भुंजे, डॉ विजय पाटील, डॉ कल्याणी शेवाळकर, डॉ मनीषा पाटील, डॉ प्रियांका केंगळे, डॉ सारिका अष्टेकर ,डॉ श्वेता जाधव, सचिन रणमोडे यांनी सहकार्य केले. 










Dr NIlesh Mahajan's 5 Days Yoga Workshop for FY Biotechnology, Computer Science and Food Technology

5 Days Yoga Workshop for FY  Biotechnology, Computer Science and Food Technology

 विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास

योगविद्या वाचस्पती डॉ निलेश महाजन यांचे मार्गदर्शन 



बारामतीतील विद्याप्रतिष्ठानमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार विज्ञान शाखेच्या बायोटेक्नोलॉजि,कॉम्प्युटर, फूड टेक्नोलॉजि च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 'उत्तम आरोग्यासाठी योगसाधना' या सहा दिवसीय योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १८० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. बारामतीतील प्रसिद्ध योगाशिक्षक डॉ. निलेश महाजन यांनी व योग महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता विद्यार्थ्यांसाठी योग, एन एस एस, कला क्रीडा, नृत्य, गायन, वादन, लघुपट अशा अनेक नवीन विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग हे अत्यंत प्रभावी आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमधील  ताणतणावाचा विचार करीता  त्यांच्या मध्ये योगाची गोडी लागणे गरजेची आहे, ज्यामुळे ते त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये स्वतःचा विकास करू शकतील यासाठी या 6  दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे मत प्राचार्य भारत शिंदे यांनी केले.           

विद्यार्थी हा पालकांच्या अपेक्षा, स्वतःची क्षमता आणि बाहेरील सपर्धात्मक युग यामध्ये सतत अप्रत्यक्ष तणावाखाली असल्याचे जाणविते. योगाच्या मध्यामातुन एकाग्रता, स्मरण शक्ती, भावनात्मक शक्तीचा विकास होऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योगशास्त्राचा आभास करणे आवश्यक असल्याचे मत या कार्यशाळेचे मुख्य समन्वयक  विजय काकडे यांनी सांगितले. 

विद्यार्थीदशेपासून जर आपण योगाभ्यास सुरवात केला तर आपल्या क्षमतांचा विकास होऊन  पुढील व्यावसायिक जीवनामध्ये येणाऱ्या शारीरिक - मानसिक तणावाला यशस्वीपणे सामोरे जाता येते. शरीर, श्वास आणि मन यांच्या समन्वयाचा अभ्यास आपल्याला यशस्वी बनवितो. असे मत डॉ निलेश महाजन यांनी सांगितले.

या  कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना श्वासावर आधारित योगासने, सूर्यनमस्कार आणि त्याचे प्रकार, प्राणायामाच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक श्वसन प्रक्रिया, ध्यान प्रक्रिया शिकविण्यात आल्या. योगशास्त्रातील योगिक शुध्दीक्रियांची माहिती, त्यांचे उपयोग याची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ श्वेता जाधव, धनश्री तोडकर, अनुराधा कुलकर्णी, हिनाकौसर अत्तार, सुनंदा बागल, मनीषा राणे, धन्वन्तरी पाटील, पल्लवी बनकर,अर्चना पोमणे यांनी सहकार्य केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विषयाचे शिक्षण डॉ. मंगेश कोळपकर व मंगल गावडे यांनी दिले,  क्रीडा विषयी माहिती व ज्ञान लक्ष्मण मेटकरी, विशाल चव्हाण यांनी दिले. या उपक्रमाकरिता उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. राजेश शर्मा, डॉ. बोरसे, किशोर ढाणे व सुजाता पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले.


Dr Nilesh Mahajan's Ayurved, Panchkarma, Yoga and Accupuncture Centre
SHarad Pride, 1st Floor, Opposite Hotel Neelam Palace, 
Late Gulabrao Dhawan Patil Chowk, Phaltan Road , Kasaba 
Baramati, Dist Pune , Pin 413102
For Appointment 9665823103