* आयुर्वेद व योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांना PhD प्रदान *
बारामतीतील प्रसिद्ध आयुर्वेद व योगतज्ञ डॉ. निलेश महाजन यांना योगशास्त्र विषयात त्यांनी केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे , भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष श्री चमू कृष्ण शास्त्री व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ हरेराम त्रिपाठी त्यांच्या हस्ते पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे.
'कोविड 19 च्या संसर्गा पश्चात निर्माण होणाऱ्या लक्षणांवर यौगिक क्रियांची परिणामकारकता- एक चिकित्सक अध्ययन' हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. नागपूर येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये हा शोध प्रबंध सादर केला होता. कैवल्यधाम लोणावळा येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ नीता विलास गाडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
गेल्या 100 वर्षांपासून योगशास्त्रात संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कैवल्यधाम या संशोधन केंद्रातून पीएच.डी पदवी प्राप्त करणारे ते पहिले विद्यार्थी ठरले आहेत. त्यासाठी सचिव ओ.पी. तिवारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. कोरोनाच्या काळामध्ये अनेक नागरिकांना मोफत योग प्रशिक्षण दिले होते, ज्याचा सकारात्मक फायदा झाल्याचे निरीक्षण अनेकांनी सांगितले होते.
मार्गदर्शक डॉ नीता गाडे यांच्या प्रोत्साहन, त्यांचा योग तत्वज्ञानाचा अभ्यास आणि सोबत संशोधक दृष्टिकोन यामुळे शोध निबंध परिपूर्ण झाल्याचे डॉ निलेश महाजन यांनी नमूद केले. विद्यापीठातील योग विभागाचे अधिष्ठता डॉ कलापिनी अगस्ती, डॉ पराग जोशी, डॉ मधुसूदन पेन्ना यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. कैवल्यधाम संचालित गोर्धनदास सेकसेरिया योग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ बंदिता सतपथी, डॉ निधीशकुमार यादव , PhD समन्वयक श्री संजय शेटे सर यांचे सहकार्य लाभले. बारामतीतील डॉ अंजली खाडे, डॉ भक्ती महाजन, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ अनिल काळे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
योगप्रसार, शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी योगाच्या प्रभावी उपयोगांवर संशोधनपर अभ्यास, आणि योग आयुर्वेद प्रशिक्षणात असलेल्या अनुभवामुळे ते या क्षेत्रातील मान्यताप्राप्त तज्ज्ञ आहेत. गेल्या 15 वर्षांपासून डॉ निलेश महाजन हे जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून योग व आयुर्वेद शास्त्राचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. अनेक कार्यशाळा व योग शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी 40000 पेक्षा अधिक लोकांना योगाचे मार्गदर्शन केले आहे. सुमारे 500 हुन अधिक विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत जे योगशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत.
लोकांनी आयुर्वेद व योग साधना आपल्या दैनंदिन वापरामध्ये ठेवावी यासाठी ते अनेकांना मार्गदर्शन करीत असतात. योग आयुर्वेदाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळण्यासाठी त्यांनी बारामतीमध्ये पहिल्या योग महाविद्यालयाची स्थापना केली आहे. ज्यामध्ये बारामती, महाराष्ट्र व पूर्ण भारतातून विद्यार्थी योगाचे शिक्षण घेत आहेत.
योग आयुर्वेदातील विविध सेमिनार, कार्यशाळा यामध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक शोधपत्रिकांमध्ये त्यांचे शोध निबंध , तसेच मासिके ,वृत्तपत्रातून त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.
बारामती व पंचक्रोशीतील नागरिकांना शास्त्रोक्त आयुर्वेद व योग उपचार देण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शन व प्रयत्नातून लवकरच सुसज्ज असे निवासी आयुर्वेद,निसर्गोपचार व योग उपचार व संशोधन केंद्र कार्यान्वित होणार आहे.