5 Days Yoga Workshop for FY Biotechnology, Computer Science and Food Technology
विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास
योगविद्या वाचस्पती डॉ निलेश महाजन यांचे मार्गदर्शन
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता विद्यार्थ्यांसाठी योग, एन एस एस, कला क्रीडा, नृत्य, गायन, वादन, लघुपट अशा अनेक नवीन विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग हे अत्यंत प्रभावी आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमधील ताणतणावाचा विचार करीता त्यांच्या मध्ये योगाची गोडी लागणे गरजेची आहे, ज्यामुळे ते त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये स्वतःचा विकास करू शकतील यासाठी या 6 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे मत प्राचार्य भारत शिंदे यांनी केले.
विद्यार्थी हा पालकांच्या अपेक्षा, स्वतःची क्षमता आणि बाहेरील सपर्धात्मक युग यामध्ये सतत अप्रत्यक्ष तणावाखाली असल्याचे जाणविते. योगाच्या मध्यामातुन एकाग्रता, स्मरण शक्ती, भावनात्मक शक्तीचा विकास होऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योगशास्त्राचा आभास करणे आवश्यक असल्याचे मत या कार्यशाळेचे मुख्य समन्वयक विजय काकडे यांनी सांगितले.
विद्यार्थीदशेपासून जर आपण योगाभ्यास सुरवात केला तर आपल्या क्षमतांचा विकास होऊन पुढील व्यावसायिक जीवनामध्ये येणाऱ्या शारीरिक - मानसिक तणावाला यशस्वीपणे सामोरे जाता येते. शरीर, श्वास आणि मन यांच्या समन्वयाचा अभ्यास आपल्याला यशस्वी बनवितो. असे मत डॉ निलेश महाजन यांनी सांगितले.
या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना श्वासावर आधारित योगासने, सूर्यनमस्कार आणि त्याचे प्रकार, प्राणायामाच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक श्वसन प्रक्रिया, ध्यान प्रक्रिया शिकविण्यात आल्या. योगशास्त्रातील योगिक शुध्दीक्रियांची माहिती, त्यांचे उपयोग याची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ श्वेता जाधव, धनश्री तोडकर, अनुराधा कुलकर्णी, हिनाकौसर अत्तार, सुनंदा बागल, मनीषा राणे, धन्वन्तरी पाटील, पल्लवी बनकर,अर्चना पोमणे यांनी सहकार्य केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विषयाचे शिक्षण डॉ. मंगेश कोळपकर व मंगल गावडे यांनी दिले, क्रीडा विषयी माहिती व ज्ञान लक्ष्मण मेटकरी, विशाल चव्हाण यांनी दिले. या उपक्रमाकरिता उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. राजेश शर्मा, डॉ. बोरसे, किशोर ढाणे व सुजाता पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
Dr Nilesh Mahajan's Ayurved, Panchkarma, Yoga and Accupuncture Centre
SHarad Pride, 1st Floor, Opposite Hotel Neelam Palace,
Late Gulabrao Dhawan Patil Chowk, Phaltan Road , Kasaba
Baramati, Dist Pune , Pin 413102
For Appointment 9665823103