जलनेती ने घालावा डोकेदुखी, ऍलर्जी, दमा आणि सर्दी

 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत जलनेती प्रशिक्षण शिबीर संपन्न

डॉ निलेश महाजन यांचे मार्गदर्शन 



              बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन नक्षत्र गार्डन येथे येणाऱ्या योग दिनानिमित्त जलनेती प्राशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. योगाचार्य डॉ निलेश महाजन आणि डॉ भक्ती महाजन यांनी  ७० साधकांना प्रत्यक्ष जलनेतीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. योगासन आणि प्राणायाम सोबत शरीराची शुद्धी करण्यासाठी हठयोगामध्ये षटकर्माचा उल्लेख केला आहे. या शुद्धीक्रियांद्वारे शरीराच्या अंतर्गत विविध भागाची आपण शुद्धता करू शकतो. त्यातील जलनेती हि सर्वात सोपी आणि सहज करण्यासाखी क्रिया आहे. केवळ अज्ञान आणि भीती यामुळे सामान्य व्यक्ती या क्रिया करायला घाबरत असतो पण त्याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपण हे सहज करू शकतो. भारतीय पारंपरिक ज्ञानाचा हा खजिना आहे केवळ आपल्या अज्ञानामुळे आणि दुर्लक्षामुळे लुप्त होऊ नये म्हणून आम्ही अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करीत आहोत. जलनेती क्रियेमुळे नाकाची आणि श्वसन मार्गाची शुद्धता होते. नियमित जलनेती अभ्यासाने वारंवार होणारी सर्दी, मायग्रेन, डोळ्याचे आजार, दमा , दीर्घकालीन खोकला यासारख्या आजारांवर जलनेतीचा चांगला फायदा होतो. असे योग महाविद्यालयाच्या संचालिका डॉ भक्ती महाजन यांनी सांगितले.


        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नक्षत्र योग ग्रुपच्या योग शिक्षिका सोनाली ठवरे, सुरेखा कराळे, पुष्पांजली कुंभार, वैशाली महाजन, धनश्री तोडकर, धन्वन्तरी पाटील, हिनाकौसर अत्तार, रेखा गेजगे, अर्चना पोमणे, अनुराधा कुलकर्णी,अश्विनी वायसे,प्रज्ञा करे यांनी सहकार्य केले.









संधिवात, पाठदुखी यासारख्या वाताच्या आजारासाठी जाणून घ्या आयुर्वेद मसाज थेरपी चे फायदे आणि प्रकार - आयुर्वेद व योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांच्याकडून

               योगविद्या वाचस्पती डॉ निलेश महाजन यांची अभ्यंग मसाज थेरपी

          अभ्यंग मसाज ही आयुर्वेदातील एक प्राचीन उपचार पद्धत आहे. औषधी सिद्ध तेलाचा वापर करून शरीराला विशिष्ट प्रकारे मसाज केला जातो. अभ्यंग हा संस्कृत शब्द आहे, शरीरातील वात, पित्त, कफ या तीन दोषांचे संतुलन राखण्यासाठी, शारीरिक तसेच मानसिक व्याधींसाठी अभ्यंग मसाज थेरपी उपयुक्त आहे. डॉ निलेश महाजन यांनी त्यांच्या अनुभवातून आणि कौशल्यातून ही विशिष्ट प्रकारची अभ्यंग मसाज थेरपी विकसित केली आहे, ज्याचा अनेकविध आजारांवर सकारात्मक फायदा अनेक रुग्णांनी अनुभवला आहे.

डॉ निलेश महाजन संशोधित अभ्यंग मसाज थेरपी कशी केली जाते?

    शरीरावर मालिश करण्यासाठी रुग्णाचे परीक्षण करून आजार, दोष, प्रकृती नुसार विशिष्ट औषधी तेल निवडले जाते. औषधी तेल सुखोष्ण करून शरीरावर सौम्य वर्तुळाकार, वक्र, सरल गतीने ताडन,पिडण अशाप्रकारे विविध  मसाजचे स्ट्रोक्स वापरून मसाज केला जातो. प्रभावित अवयव यांना विशेष पद्धतीने मसाज करतात. मसाज करताना आयुर्वेदातील मर्म स्थानांचा विचार केला जातो, ज्या ठिकाणी मसाज केल्यामुळे तेथील प्राणशक्तीचे वहन व्यवस्थित होते, तसेच ॲक्युपंक्चर मधील काही विशिष्ट पॉईंट वरती मर्दन केले जाते. विशिष्ट प्रकारे मसाज झाल्यावर औषधी वनस्पतींचा काढा वापरून वाफ दिली जाते,ज्यामुळे रुग्णाच्या वेदना, दुखावा, सूज कमी होण्यास मदत होते. आजारानुसार हे औषधी द्रव्ये बदलतात, तसेच आवश्यकता पडल्यास औषधी वनस्पतींची पाने वापरून (पत्रपोट्टली) केला जातो आणि औषधी लेप करून आयुर्वेदाच्या शल्य चिकित्सेतील पट्टबंधन केले जाते. ज्यामुळे अधिक कालावधी पर्यंत औषधी द्रव्ये प्रभावित भागावर कार्य करतात. 

डॉ निलेश महाजन विकसित अभ्यंग मसाज थेरपीचे प्रकार

आजारानुसार कोणता अभ्यंग करावा यानुसार त्याचे विविध प्रकार पडतात.

१)      1) अभ्यंग मसाज

२)      2)उद्वर्तन मसाज (Medicinal Powder Massage)

३)      3) मर्दन मसाज (Deep  Tissue Massage)

४)      4) व्हॅक्युम मसाज (Vaccum Massage)

५)      5) पॅरालिसिस मसाज (Paralysis Massage)

६)      6)  स्पाईन केअर मसाज – पाठीच्या मणक्यांच्या आजारांसाठी

७)     7) सूतिका अभ्यंग : बाळंतीन आईच्या आरोग्यासाठी विशेष मसाज

यासोबत अक्षीतर्पण, कर्णपुरण, परिषेक, संवाहन, शिरोभ्यंग, हृद्यधारा, परिषेक, पादाभ्यंग असे वेगवेगळे स्नेह अभ्यंगाचा वापर केला जातो. वरील पैकी १ किवा २ मसाज प्रकार रुग्ण तपासणी करून आजार, तीव्रतेनुसार एकत्र करून वापरले जातात. आवश्यकतेनुसार आयुर्वेदातील शरीरशुद्धिकरण चिकित्सेचा वापर केला जातो. 

अभ्यंग मसाज थेरपी चे फायदे: -

     नियमित अभ्यंग केल्याने त्वचा चांगली राहते. अत्याधिक काम व्यायाम यामुळे मांसपेशी आणि स्नायूंमधील येणारा थकवा दूर व्हायला मदत होते. अभ्यंगातील तेल स्नेहयुक्त असल्याने वातदोष कमी करते. दृष्टी सुधारते, झोप चांगली लागते, स्नायूंची ताठरता कमी होवून लवचिकता वाढते व स्नायू पिळदार होतात. त्वचेची कांती सुधारते, विशिष्ट पद्धतीने केलेला अभ्यंग मेंदूला उत्तेजित करतो. उत्साह वाढविणाऱ्या संप्रेरकाचे(हार्मोन) प्रमाण वाढवतो. अभ्यंग केलेल्या अवयवाचा रक्तपुरवठा वाढतो, त्यामुळे विषाक्त द्रव्य बाहेर टाकले जातात आणि पोषण मूल्याचा पुरवठा व्यवस्थित केला जातो. सेरेटोनिन व इतर प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर चे प्रमाण मसाजमुळे वाढवले जाते, जे चिंता, नैराश्य व ताणतणाव कमी करायला मदत करते. हृदयाकडे रक्त सहजरित्या पाठवले जाते, या सर्वांमुळे शरीरामध्ये एक नवचैतन निर्माण होते. वेदना, दुखावा सूज कमी होवून अवयवांची कार्यक्षमता वाढते.

 

अभंग मसाज थेरपी कोणासाठी उपयोगी?

संधिवात: गुडघेदुखी, आमवात, वातरक्त, लिगॅमेंट किवा कुर्चा फाटने किंवा झीज होणे, तसेच चिकन गुनिया नंतर होणारी सांधेदुखी, सांध्यातील वंगण कमी होणे.

मणक्यांचे आजार: पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी , स्पॉडीलायटीस, मणक्यातील गादी सरकणे (सायटिका), हातापायाला मुंग्या येणे, चालताना कमरेपासून पाय दुखणे.

पॅरालिसिस: अर्धांग वायू, लकवा, अंगावरून वारे जाणे, चेहऱ्याचा पक्षघात (Fascial Paralysis) मणक्याला मार लागल्यामुळे निर्माण होणारा, मेंदूची कार्यक्षमता कमी होणे, सेरेब्रल अट्रॉफी

तणावजन्य आजारांवर: निद्रानाश, मायग्रेन, पित्त उठणे, आळस, शरीर दुर्बलता, मानसिक अस्वस्थता वाटणे.  

पोटाचे आजार: बद्धकोष्ठता, मुळव्याध, पचन तंत्र बिघडणे, आतड्यांना सूज असणे

हृद्य विकार: उच्च रक्तदाब, रक्ताभिसरणातील अडचणी,

त्वचा विकार: सोरीयासीस , नायटा , इसब इतर त्वचा रोग

केसांचे आजार: केस गळणे, चाई पडणे कोंडा होणे, केसांची वाढ न होणे  

संपर्क : फोन नं : ९६६५८२३१०३

दवाखाना: १) शरद प्राईड, पहिला मजला, हॉटेल निलम पलेस समोर, गुलाबराव ढवाण पाटील चौक, फलटण रोड , कसबा , बारामती ( वेळ सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत )

२)  समृद्धी कॉम्प्लेक्स, पहिला मजला , लेन नं २ , सुर्यनगरी, साई समर्थ दातांच्या दवाखाना, दर गुरुवार संध्या ४ ते ८ वाजेपर्यंत   


डॉ निलेश महाजन

आयुर्वेद तज्ञ, योगविद्या वाचस्पती(PhD,योग)

योग प्रमाणीकरण मंडळ प्रमाणित योग शिक्षक


डॉ भक्ती महाजन

आयुर्वेद व योग तज्ञ ,

संचालक : योग महाविद्यालय , बारामती

 








बारामतीतील कसब्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ च्या निमित्ताने महिलांसाठी योग शिबिराचे आयोजन


आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त बाल कल्याण केंद्र आणि जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन च्या माध्यमातून महिलांसाठी दिनांक 10 जुन पासून 14 जून 2025 मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कसब्यातील बाल कल्याण केंद्राच्या शाळेमध्ये सकाळी ६. ते ७. वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. या शिबिराला बारामतीतील प्रसिद्ध आयुर्वेद व योग तज्ज्ञ डॉ निलेश महाजन व डॉ भक्ती महाजन हे महिलांना योगासन प्राणायामाचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे कसबा परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन बाल  कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ अनिल मोकाशी यांनी केले आहे.  

      कुटुंबातील रोजचे कार्य करीत असतांना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. महिलांमध्ये सध्या PCOD , पाळीच्या तक्रारी, थायरॉईड चे आजार वाढत चालले आहे , त्यासोबत संधिवात, मान दुखी, कंबर दुखी, केश गळती, शारीरिक मानसिक थकवा असे आजार वाढत चालले आहेत. या आजारांच्या उपचार स्वरूप योगसाधना प्रभावी आहे. त्याचे प्रशिक्षण देण्यासाठीच या योग्य शिबिराचे आयोजन केल्याची माहिती, डॉ भक्ती महाजन यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी २ फोटो आणि आधार कार्ड ची झेरॉक्स आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी ९६६५८२३१०३ या नंबर वर फोन करावा. 

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त महिलांसाठी मोफत योग शिबीर

*दिनांक:* 10 जुन 2025 ते 14 जून 2025

*स्थळ:* बाल कल्याण केंद्र शाळा, विठ्ठल प्लाझाच्या मागे,  कसबा, बारामती

*वेळ:* सकाळी 6.30am to 7.30am

*महिलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त योगासने,प्राणायाम,ध्यान यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण.*

*PCOD, पाळीच्या तक्रारी, कंबर दुःखी, पाठदुखी, मानदुखी, गुडघे दुःखी, निद्रानाश, केश गळती यावर उपयोगी अशा यौगिक क्रियांचे मार्गदर्शन*

नाव नोंदणी साठी संपर्क*: 9665823103

*प्रमुख मार्गदर्शक:*
*डॉ निलेश महाजन*
आयुर्वेद व योगोपचार तज्ञ
PhD योगा
*डॉ भक्ती महाजन*
*संचालक:* योग महाविद्यालय, बारामती















पावसाळ्यातील चाळीशी नंतरच्या सांधेदुखी, पाठदुखी यासारख्या वात विकारांसाठी डॉ महाजन यांचे पंचकर्म उपचार

 


सध्या नेहमीच्या वेळेआधीच पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी ताप खोकला सुरु झाला आहे , पण त्यासोबत चाळीशी नंतर होणारे वात विकार जसे सांधे दुखी , मान दुखी , पाठ दुखी , मणक्यांचे आजार, शरीरावर येणारी सूज , गुडघेदुखी असे आजार वाढू लागले आहेत. यासाठी आयुर्वेदातील औषधी , पंचकर्म उपचार फायदेशीर ठरताना दिसत आहेत. बारामतीतील सुप्रसिद्ध डॉ निलेश महाजन यांच्या स्पाइन जॉईंट थेरपी मध्ये सांध्याला आयुर्वेदिक तेलाने मसाज केला जातो , औषधी काढ्याची वाफ दिली जाते आणि औषधी तेल किंवा काढे यांची बस्ती दिली जाते म्हणजेच याने शरीर शुद्धी होऊन , वात कमी होतो, स्नायूंना सांध्यांना बळकटी मिळते. आणि लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे असे लक्षणे आपणास असतील तर आपण त्वरित बारामतीतील डॉ निलेश महाजन यांच्या आयुर्वेद पंचकर्म सेंटर ला भेट द्यावी. १ महिन्याचा औषधांचे खर्च केवळ २८९९/- आणि ७ दिवसांचे पंचकर्म केवळ १९९९९/- मध्ये उपलब्ध आहेत. आणि एकदिवसीय मसाज/ वाफ केवळ ८९९/- मध्ये उपलब्ध आहे. त्वरित संपर्क करावा ९६६५८२३१०३. बारामतीतील कसबा आणि सूर्यनगरी मध्ये पंचकर्म उपचार होतात. डॉ निलेश महाजन यांची पंचकर्माची माहिती पुढील लिंक वर क्लिक करून जाणून घ्यावी  https://www.pranyoga.org/panchakarma 






आपल्याला आयुर्वेद , योग , निसर्गोपचार च्या आरोग्य क्षेत्रात करिअर करायचे आहे ? मग आपण हे कोर्सेस केलेच पाहिजेत

 

  भारत आणि विश्वामध्ये  योग,आयुर्वेद, निसर्गोपचार उपचार पद्धतीला मागणी वाढत आहे. या क्षेत्रात कार्य करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 101% रोजगाराच्या संधी असलेले विविध कोर्सेस तेही महाराष्ट्र सरकार आणि UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून करता येतात. बारामतीतील योग्य महाविद्यालय बारामती आपणासाठी खालील कोर्सेस चे दर्जेदार शिक्षण देणारे महाराष्ट्रातील नंबर एक चे महाविद्यालय आहे. आयुर्वेद, पंचकर्म , योग व निसर्गोपचार केंद्रामध्ये हे  कोर्सेस  केलेल्या मनुष्यबळाची सध्या नितांत आवश्यकता आहे. अगदी बारामती सारख्या ग्रामीण भागापासून ते पुण्या मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्येही याची मागणी आहे त्यामुळे आपण त्याची माहिती घेऊन प्रवेश निश्चित करावा.सध्या १५ जून २०२५ पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे  

प्रवेशासाठी संपर्क: 9665823103

योग, पंचकर्म व निसर्गोपचार महाविद्यालय, बारामती

१.डिप्लोमा इन योगा टीचर(1 वर्ष), पात्रता: 12 वी पास, शुल्क : 9100/-                

२.M.A. योगा(2 वर्ष), पात्रता: Any Graduate प्रवेश शुल्क: 18500/- प्रति वर्ष     

३. डिप्लोमा इन आयुर्वेदिक मसाज अँड पंचकर्म टेक्निशियन, 1 वर्ष, पात्रता: 12 वी पास, प्रवेश शुल्क: 20000/- 

४. डिप्लोमा इन आयुर्वेद पंचकर्म: 1 वर्ष , पात्रता: BAMS डॉक्टर/ वैद्य/इंटर्नशिप विद्यार्थी, शुल्क: 30000/- 

(BAMS नसलेल्यांसाठी कालावधी 2 वर्ष आणि शुल्क 30000/- प्रती वर्ष)          

योग महाविद्यालयाचे ब्रोशर, अभ्यासक्रम  आणि प्रवेश अर्जाच्या काही महत्वाच्या लिंक्स आहे त्यावरून अधिक माहिती करून घ्यावी                                                                                                                                        1) Information Brosher

https://www.pranyoga.org/brosher-for-courses 

2) Syllabus of Courses

https://www.pranyoga.org/syllabus

3) Apllication form for admissions

https://www.pranyoga.org/general-1


योग महाविद्यालयामध्ये आयुर्वेद , योग, निसर्गोपचार क्षेत्रात २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी पर्यंत अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स , प्रशिक्षक आहेत. आयुर्वेदातील पंचकर्म, योग चिकित्सा  व इतर उपचार पद्धतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळण्यासाठी उपचार केंद्र उपलब्ध आहे , जिथे आपणास प्रत्यक्ष  योग , पंचकर्म शिकता येणार आहे. प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि योगाचार्य डॉ निलेश महाजन हे या योग महाविद्यालयाचे संचालक आणि प्रधान चिकित्सक आहेत. त्यांच्या दूर दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आयुर्वेद, योग व निसर्गोपचाराची आवश्यकता ओळखून त्यांनी या कोर्सेस ची प्रशिक्षण संस्था सुरु केली आहे. 






योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांचे बाल योग संस्कार शिबिरात आरोग्य, अध्यात्म, भारतीय तत्वज्ञानाचे मार्गदर्शन

योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांचे बाल योग संस्कार शिबिरात आरोग्य, अध्यात्म, भारतीय तत्वज्ञानाचे मार्गदर्शन 

 उन्हाळी बाल योग संस्कार शिबिराची उत्साहात सांगता 

बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशनच्या मार्फत लहान मुलांसाठी दिनांक 2 मे ते 20मे पर्यंत आयोजित उन्हाळी बाल योग संस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला . जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित उन्हाळी शिबिरामध्ये एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी श्लोक पठण स्पर्धा, योगासन स्पर्धा घेण्यात आली. समारोप प्रसंगी शिबीर यशस्वी रित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एमआयडीसी बारामतीचे विभागीय आयुक्त हनुमंत पाटील, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, सुधीर पराडकर, प्रा अतुल भुजबळ  यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

                                        

 या शिबिरामध्ये विविध प्रगत योगासने, समंत्र सूर्यनमस्कार, मेंदूला चालना देण्यासाठीच्या यौगिक हालचाली,शंखवादन माहिती, विविध श्लोकपठण यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेबद्दल जागृती व्हावी व भाषा सहज बोलता यावी यासाठी संस्कृत संभाषण,  विविध मन्त्र , रामरक्षा पठण घेण्यात आले. योग महाविद्यालयाचे संचालक डॉ भक्ती महाजन , डॉ निलेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



आजच्या भौतिकवाद, चंगळवादाच्या युगामध्ये सर्वांचीच आणि विशेषता: तरुण वर्गाची आनंदाचा परिभाषा  बदलली आहे. त्यामुळे केवळ इंद्रिय तृप्ती, भौतिक गोष्टी मिळविण्यासाठीच प्रत्येकाची धडपड असते. त्यातूनच स्पर्धा, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, नैराश्य, तणाव, मानसिक समस्या निर्माण होत असते. त्यामुळेच लहान वयातच गुन्ह्यांचे प्रमाण आपणाला वाढलेले दिसते. लहान मुलांना जर आपण याबाबतची माहिती दिली, त्यांच्या शरीर, मन, इंद्रिये, बुद्धी यांचा साचेबद्ध ओळख करून दिली आणि आनंदाची संकल्पना हि केवळ भौतिक नसून, अध्यात्मिक पातळीवर हि आहे याची शिकवण दिली तर घर घरातून स्वामी विवेकानंद निर्माण होतील आणि समाज परिवर्तन घडेल. असे मत यावेळी आयुर्वेद व योग हॉस्पिटल चे प्रमुख डॉ निलेश महाजन यांनी व्यक्त केले.  

      आजचे मुले हे उद्याच्या भारताचे नागरिक आहेत. त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकास होणे सशक्त भारताच्या निर्माणसाठी आवश्यक आहे. या शिबिराच्या निमित्ताने त्यांच्या मध्ये आरोग्य विषयी, स्वतः मधील विविध गुणांविषयी, मानसिक व भावनिक जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही या शिबिराचे आयोजन आवश्यक आहे, असे मत हनुमंत पाटील यांनी व्यक्त केले. 

                                  

मुलांना शाळेतील अभ्यासा व्यतिरिक्तचे ज्ञान अध्यात्मिक पुस्तके, बोधकथा , महान पुरुषांचे चरित्र वाचन    यातून मिळविले पाहिजे. आम्ही मुलांना हे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक पालकांनी त्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. असे शिबिराच्या समन्वयक  डॉ भक्ती महाजन यांनी सांगितले.  

                                                          

   बारामती क्रीडा संकुल नेहमीच अशा चांगल्या विधायक कार्याला सहकार्य करीत असते. डॉ निलेश महाजन यांचा लहान मुलांवर संस्कार करण्याचा जो विचार आहे तो अगदी योग्य आहे. मनाचे संगोपन शिकविणे हि काळाची गरज आहे. असे मत तालुका क्रीडा अधिकारी श्री महेश चवले यांनी व्यक्त केले. 

                                            

 शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, अभिजित इंगुले , योग महाविद्यालायचे विद्यार्थी डॉ श्वेता जाधव, धनश्री तोडकर, सचिन रनमोडे, हिनाकौसर अत्तार, पल्लवी बनकर, सुनंदा बागल, अश्विनी वायसे, यांनी सहकार्य केले.

                                        

                                        










बारामतीत २ मे ते २० मे २०२५ पर्यंत बाल योग संस्कार शिबीराचे आयोजन

                            बारामतीत २ मे ते २० मे  २०२५ पर्यंत बाल योग संस्कार शिबीराचे आयोजन 

योगतज्ज्ञ निलेश महाजन देणार योग व भारतीय तत्वज्ञानाचे प्रशिक्षण 


बारामतीत बाल योग संस्कार शिबीराचे आयोजन 
योगतज्ज्ञ निलेश महाजन देणार योग व भारतीय तत्वज्ञानाचे प्रशिक्षण 

बारामतीतील आयुर्वेद व योग उपचार केंद्राचे प्रमुख डॉ निलेश महाजन यांच्या प्रेरणेने व जीवनविद्या योग्य आयुर्वेद फौंडेशन यांच्या माध्यमातून येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये २ मे ते २० मे  २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी ७. ३० ते ९ वाजेपर्यंत उन्हाळी बाल योग संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांना भारतीय तत्वज्ञान, योग, आयुर्वेद, अध्यात्माची ओळख व्हावी, आरोग्याविषयी जागरूकता वाढावी, शरीर, मन आणि अध्यात्मिक गोष्टी कळाव्यात यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याची माहिती तालुका क्रीडा अधिकारी श्री महेश चावले यांनी दिली . भगवत गीता,उपनिषद, योग, आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास असणारे प्रसिद्ध डॉ निलेश महाजन हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  या बाल योग संस्कार शिबिरामध्ये विविध योगासने, प्राणायाम,  मंत्रपठण, बोध कथा ,मेंदूची क्षमता विकसित करण्याचे व्यायाम, ध्यान , धारणा, अष्टांग योग याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुलांची प्रतिकार शक्ती, एकाग्रता, स्मरण शक्ती वाढविण्यासाठी, शारीरिक मानसिक सुदृढतेसाठी, कार्यक्षमता वाढीसाठी, उंची वाढण्यासाठी या प्रक्रियांचा उपयोग होणार आहे. प्रत्यक्ष सहभागी विद्यार्थ्याला विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी देणगी शुल्क ९९९ /- एवढे असणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी ९६६५८२३१०३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


डॉ निलेश महाजन प्रेरित आणि जीवनविद्या इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड आयुर्वेद संचालित

उन्हाळी योग संस्कार वर्ग (लहान मुलांसाठी)  (वय : 8 ते 16 वयापर्यंत)

या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या मुलांसाठी विशेष  योग संस्कार वर्ग

या योग वर्गामध्ये 
योगासने
सूर्यनमस्कार
श्लोक पठण
प्राणायाम
धारणा - ध्यान शिकविण्यात येणार आहे.

उपयुक्तता:
🧘🏻‍♂️लहान मुलांची प्रतिकार शक्ती एकाग्रता स्मरण शक्ती उंची वाढण्यासाठी 
🧘🏻‍♂️व्यक्तिमत्व विकासासाठी
🧘🏻‍♂️उच्चारण स्पष्ट होण्यासाठी
🧘🏻‍♂️स्वतः ची ओळख होण्यासाठी 
🧘🏻‍♀️बालकाच्या मानसिक व शारीरिक सुदृढतेसाठी 
🧘🏻‍♀️अष्टांग योगाचा परिपूर्ण अभ्यास 
 🧘🏻‍♀️धारणा ध्यान  पूर्व तयारी

वैशिष्ट्ये:
👉🏻योग वर्गासाठी प्रशस्त हॉल
👉🏻तज्ज्ञ प्रशिक्षक व मार्गदर्शक 
योग ही काळाची गरज आहे. 
👉🏻प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

कालावधी:  2 मे ते 20 मे 2025 पर्यंत

शुल्क :999/-

स्थळ : जिल्हा क्रीडा संकुल , देसाई इस्टेट ,बारामती

वेळ: सकाळी 7.30 ते 9.00 am

संपर्क :
प्रमुख मार्गदर्शक
डॉ निलेश महाजन
आयुर्वेद व योगोपचार तज्ज्ञ 
9665823103
डॉ भक्ती महाजन
आयुर्वेद व योगोपचार तज्ज्ञ