आयुर्वेद व योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांना PhD प्रदान
डॉ भक्ती महाजन यांचा लोकमत मीडिया ग्रुप तर्फे सन्मान
डॉ भक्ती महाजन यांचा लोकमत मीडिया ग्रुप तर्फे सन्मान
महिला दिनाचे औचित्य साधत त्यांच्या आयुर्वेद, योग व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचे कौतुक
बारामतीतील सुप्रसिद्ध डॉ भक्ती महाजन यांना आयुर्वेद व योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकमत मिडिया ग्रुप चे संपादक श्री संजय आवटे यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामतीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना लोकमत मीडिया ग्रुप तर्फे सन्मानित करण्यात आले. लोकमत मीडिया ग्रुप चे चेअरमन डॉ विजय दर्डा यांची स्वाक्षरी व संदेश असलेल्या सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ भक्ती महाजन हे गेल्या १५ वर्षांपासून बारामती मध्ये आयुर्वेद व योगोपचार तज्ज्ञ म्ह्णून कार्य करीत आहेत. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून त्या समाजकार्यामध्येही अग्रेसर असतात. योगशास्त्राच्या माध्यमातून महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्या त्यांना मदत करीत असतात. बारामतीतमध्ये प्रथमच सुरु झालेल्या योग महाविद्यालयाच्या त्या संचालक आहेत. महिलांसाठी अनेक मोफत योग शिबिरांचे आयोजन त्यांनी केले आहे. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये त्यांचे शोध निबंध प्रकशित झाले आहेत. भारतीय तत्वज्ञानाची आवड असल्याने आयुर्वेदाच्या पदवी सोबतच त्यांनी योग आणि संस्कृत विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आधुनिक युगातील महिला घर सांभाळून, आता घरातील इतर कार्यानाही हातभार लावत आहेत. हे करीत असताना त्यांची जी ओढाताण होते त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. त्यासाठी सर्व महिलांनी योगसाधना करणे, योग तत्वज्ञान आत्मसाद करणे आणि व्यवहारामध्ये अमलात आणणे गरजेचे आहे असे त्यांचे मत आहे.
लोकमत मिडिया ग्रुप चे बारामतीतील वरिष्ठ पत्रकार श्री प्रशांत ननावरे यांनी यासाठी सहकार्य केले.
ताणतणाव निवारणासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक
सोमेश्वरनगर मधील शरदचंद्र पवार इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलोंजि महाविद्यालयात ताणताणाव व्यवस्थापनावर व्याख्यान
भावी इंजिनिअर विद्यार्थ्यांना डॉ महाजन यांचा मूलमंत्र
.jpeg)
योग आपल्या शरीर आणि मनाचा समन्वय साधण्यासाठी मदत करतो. हा समन्वय साधण्यासाठी श्वसन क्रिया, मेंदूची कार्यक्षमता वाढविणाऱ्या क्रिया, एकाग्र ध्यान प्रक्रिया यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्राचार्य हजारे एस के, प्राध्यापक धापटे एस एन ,बनकर एस जी उपस्थित होते. योग शिक्षक बनकर पी एस यांनी प्रास्ताविक केले, शिंदे पी जे यांनी आभार मानले.
Dr Nilesh Mahajan's Stress Management training to Students of Government Ayurveda College, Baramati, Pune, Maharashtra, India, 413115वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तणाव व्यवस्थापन शिकणे आवश्यक : डॉ निलेश महाजन बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात तणाव व्यवस्थापनावर व्याख्यान
बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या विद्यमाने 'तणाव व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीतील आयुर्वेद व योगोपचार तज्ञ डॉ निलेश महाजन यांनी आयुर्वेदाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा ६५ जणांना तणाव म्हणजे काय, त्याचा शरीरावर होणार परिणाम, तणाव व्यवस्थापनासाठी योग प्रक्रिया, ध्यानाचे सोपे प्रकार यांचे धडे दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल काळे, डॉ सूर्यकांत रोकडे, डॉ प्रशांत साळी, डॉ क्षितिज गर्गे, डॉ सुरज भुंजे, डॉ विजय पाटील, डॉ कल्याणी शेवाळकर, डॉ मनीषा पाटील, डॉ प्रियांका केंगळे, डॉ सारिका अष्टेकर ,डॉ श्वेता जाधव, सचिन रणमोडे यांनी सहकार्य केले.
Dr NIlesh Mahajan's 5 Days Yoga Workshop for FY Biotechnology, Computer Science and Food Technology
विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास
योगविद्या वाचस्पती डॉ निलेश महाजन यांचे मार्गदर्शन
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता विद्यार्थ्यांसाठी योग, एन एस एस, कला क्रीडा, नृत्य, गायन, वादन, लघुपट अशा अनेक नवीन विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग हे अत्यंत प्रभावी आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमधील ताणतणावाचा विचार करीता त्यांच्या मध्ये योगाची गोडी लागणे गरजेची आहे, ज्यामुळे ते त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये स्वतःचा विकास करू शकतील यासाठी या 6 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे मत प्राचार्य भारत शिंदे यांनी केले.
विद्यार्थी हा पालकांच्या अपेक्षा, स्वतःची क्षमता आणि बाहेरील सपर्धात्मक युग यामध्ये सतत अप्रत्यक्ष तणावाखाली असल्याचे जाणविते. योगाच्या मध्यामातुन एकाग्रता, स्मरण शक्ती, भावनात्मक शक्तीचा विकास होऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योगशास्त्राचा आभास करणे आवश्यक असल्याचे मत या कार्यशाळेचे मुख्य समन्वयक विजय काकडे यांनी सांगितले.
विद्यार्थीदशेपासून जर आपण योगाभ्यास सुरवात केला तर आपल्या क्षमतांचा विकास होऊन पुढील व्यावसायिक जीवनामध्ये येणाऱ्या शारीरिक - मानसिक तणावाला यशस्वीपणे सामोरे जाता येते. शरीर, श्वास आणि मन यांच्या समन्वयाचा अभ्यास आपल्याला यशस्वी बनवितो. असे मत डॉ निलेश महाजन यांनी सांगितले.
Jalneti Training Program by Dr Nilesh Mahajan
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, डॉ श्वेता जाधव, सचिन रानमोडे, अश्विनी वायसे, नंदिनी खोमणे यांनी सहकार्य केले.

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


