डॉ भक्ती महाजन यांचा लोकमत मीडिया ग्रुप तर्फे सन्मान
महिला दिनाचे औचित्य साधत त्यांच्या आयुर्वेद, योग व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचे कौतुक
बारामतीतील सुप्रसिद्ध डॉ भक्ती महाजन यांना आयुर्वेद व योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकमत मिडिया ग्रुप चे संपादक श्री संजय आवटे यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामतीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना लोकमत मीडिया ग्रुप तर्फे सन्मानित करण्यात आले. लोकमत मीडिया ग्रुप चे चेअरमन डॉ विजय दर्डा यांची स्वाक्षरी व संदेश असलेल्या सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ भक्ती महाजन हे गेल्या १५ वर्षांपासून बारामती मध्ये आयुर्वेद व योगोपचार तज्ज्ञ म्ह्णून कार्य करीत आहेत. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून त्या समाजकार्यामध्येही अग्रेसर असतात. योगशास्त्राच्या माध्यमातून महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्या त्यांना मदत करीत असतात. बारामतीतमध्ये प्रथमच सुरु झालेल्या योग महाविद्यालयाच्या त्या संचालक आहेत. महिलांसाठी अनेक मोफत योग शिबिरांचे आयोजन त्यांनी केले आहे. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये त्यांचे शोध निबंध प्रकशित झाले आहेत. भारतीय तत्वज्ञानाची आवड असल्याने आयुर्वेदाच्या पदवी सोबतच त्यांनी योग आणि संस्कृत विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आधुनिक युगातील महिला घर सांभाळून, आता घरातील इतर कार्यानाही हातभार लावत आहेत. हे करीत असताना त्यांची जी ओढाताण होते त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. त्यासाठी सर्व महिलांनी योगसाधना करणे, योग तत्वज्ञान आत्मसाद करणे आणि व्यवहारामध्ये अमलात आणणे गरजेचे आहे असे त्यांचे मत आहे.
लोकमत मिडिया ग्रुप चे बारामतीतील वरिष्ठ पत्रकार श्री प्रशांत ननावरे यांनी यासाठी सहकार्य केले.