बारामतीतील डॉ महाजन दाम्पत्यांना स्वातंत्र्य दिनाचे विशेष अतिथी म्हणून निमंत्रण

बारामतीतील डॉ महाजन दाम्पत्यांना स्वातंत्र्य दिनाचे विशेष अतिथी म्हणून निमंत्रण 


भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे बारामतीतील डॉ निलेश महाजन व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ भक्ती महाजन यांना दिल्लीमध्ये होणाऱ्या येत्या स्वातंत्र्यदिनीच्या समारंभामध्ये उपस्थित राहण्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. १३ तारखे पासून ते १७ तारखे पर्यंत त्यांना या समारंभामध्ये आमंत्रित केले आहे. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय  योग संस्थान, योग प्रमाणीकरण मंडळ याठिकाणी जाऊन ते थेतील कार्यपद्धतीचा,योगशिक्षणाच्या नवीन संकल्पनांचा अभ्यास करणार आहेत. आयुष मंत्रालयातर्फे दिल्लीमधील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्याचेही नियोजन असणार आहे.   

बारामती, पुणे शहरामध्ये  डॉ महाजन दाम्पत्य हे योग व आयुर्वेद प्रचार व प्रसाराचे कार्य करीत आहेत. उभय दाम्पत्यांनी बारामतीत योग महाविद्यालया स्थापना केली आहे, त्याद्वारे योगशास्त्राचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात येते. आयुर्वेद क्षेत्रातही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठीहि आयुर्वेदिक पंचकर्माचे कोर्से सुरु करून रोजगार निर्मिती साठी हातभार लावला आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध सरकारी, खाजगी संस्थांमध्ये योगशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.  विविध मोफत योगशिबिरांच्या माध्यमातून उभय दाम्पत्य सामाजिक भान जपून सेवा देत आहेत. योगशास्त्रात संशोधन व नाविन्यपूर्ण संकल्पनेतुन विविध कार्यक्रमाद्वारे समाज प्रबोधनाचे, तसेच आरोग्या विषयी जनजागृतीचे कार्य सुरु आहे.  आयुष मंत्रालयाच्या योग प्रमाणीकरण मंडळातर्फे त्यांच्या संस्थेला मान्यता मिळाली आहे. बारामतीसारख्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे मान्यता मिळवणारी त्यांची हि पहिली संस्था आहे. विविध मान्यता प्राप्त पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. उभयतांच्या योग क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन आयुष मंत्रालयातर्फे त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. 

डॉ निलेश महाजन यांना उत्कृष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार

 डॉ निलेश महाजन यांना उत्कृष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार( Bacth 2001-2002)


        बारामतीतील आयुर्वेद व योग तज्ञ डॉ निलेश महाजन यांना नुकतेच उत्कृष्ट माजी विद्यार्थी या पुरस्काराने महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या सुमतिभाई शहा आयुर्वेद महाविद्यालय हडपसर यांच्या वतीने  सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक, संशोधन, नाविन्यपूर्ण कामाचा आढावा घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

हडपसर येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव मा अनिल गुजर, सहसचिव मा अरुण गुजर, भारती विद्यापीठ आयुर्वेद कॉलेज चे प्राचार्य डॉ शैलेश देशपांडे यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ सचिन कुमार पाटील,उपप्राचार्य डॉ विवेक चौधरी, डॉ नितेश जोशी,  शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मानपत्र, शाल आणि पुणेरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 


डॉ निलेश महाजन हे आयुर्वेद व योग क्षेत्रात संशोधन, विविध सामाजिक उपक्रम व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. त्यामुळे हजारो नागरिकांना आरोग्यासाठी त्याचा लाभ होत आहे.  बारामती मध्ये पहिल्या  महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली आहे. यामाध्यमातून योग आयुर्वेद शाश्त्राचा प्रचार आणि प्रसार करीत असतात. ५०० हुन अधिक विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयात योग व आयुर्वेदाचे धडे घेत आहेत. अनेक विद्यार्थी योग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी देखील मिळाल्या आहेत. सुमारे ४०००० नागरिकांना त्यांनी योगाचे प्रशिक्षण दिले आहे. आयुष मंत्रालयाच्या योग प्रमाणीकरण मंडळातर्फे त्यांच्या संस्थेला प्रमाणित योग संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.  


पुण्यातील डॉ सुधांशु ताकवले (Batch 2002-2003), डॉ नेहा गाडगीळ(Batch 2003-2004) यांनाही यावेळी उत्कृष्ट माजी विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.









योग विद्या वाचस्पती डॉ निलेश महाजन यांच्या माध्यमातून बारामतीत उभारतेय योग चळवळ


 आयुर्वेद व योग तज्ञ डॉ निलेश महाजन यांच्या संकल्पनेतून बारामतीत योग चळवळ उभी राहत आहे. जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन च्या माध्यमातून ते स्वत: बारामती परिसरामध्ये योग प्रशिक्षण देत आहेत. आतापर्यंत अनेक ठिकाणी मोफत योग शिबिरांचे आयोजन करून अनेक नागरिकांना योगाचे ज्ञान दिले आहे. तसेच योगाच्या माध्यामतून अनेक रुग्णांना त्यांनी फायदा मिळवून दिलेला आहे. योगासने, प्राणायाम , विविध शुद्धीक्रिया आणि ध्यान यावर त्यांनी शरीरक्रियात्मक दृष्टीने अभ्यास करून विविध संशोधने केली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने बारामतीती पहिल्या योग महाविद्यालायाची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामध्ये योगशास्त्राचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जात आहे. 
 गेल्या पाच वर्षांपासून १००० पेक्षा अधिक विद्यार्थी बारामती, पुणे आणि महाराष्ट्र भरातून योग शिकण्यासाठी येत आहेत. अनेक विद्यार्थी आता स्वत: योग शिकण्यासाठी सज्ज झाले आहेत.  तेही बारामतीमध्ये विविध ठिकाणी योग वर्ग चालवीत आहेत, त्या निमित्ताने अनेक महिला आणि नागरिकांना योग , आरोग्याचे धडे मिळत आहेत. त्यांना विविध रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. डॉ निलेश महाजन आणि डॉ भक्ती महाजन हे दाम्पत्य त्यांना नियमित मार्गदर्शन करीत असतात. 

 आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ च्या निमित्ताने योग महाविद्यालायाच्या अनेक विद्यार्थ्यांना डॉ निलेश महाजन आणि डॉ भक्ती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिनाच्या कार्यक्रमासाठी योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी विविध शाळांमध्ये, कंपन्यांमध्ये एकूण ३००० विद्यार्थ्यांना याद्वारे योगाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल, बाल कल्याण केंद्र प्राथमिक शाळा, मेडिकोज गिल्ड , शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठानचे पिंपळी व न्यू इंग्लिश माध्यम शाळा, मराठी मध्यम शाळा, धों. आ सताव माध्यमिक शाळा, कवी मोरोपंत माध्यमिक शाळा, टेक्सटाईल पार्क , म ए सो इंग्रजी माध्यम शाळा, शारदा निकेतन , चंदूकाका सराफ ज्वेलर्स, बारामती अग्रो, अचीवर्स इंग्रजी माध्यम शाळा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इत्यादी अस्थापनांमध्ये स्वतः डॉ निलेश महाजन , डॉ भक्ती महाजन यांनी व विविध विद्यार्थ्यांद्वारे योगाचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन करण्यात आले.

योग महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉ श्वेता जाधव, डॉ मृण्मयी भेडसगावकर, डॉ दीपाली माने, अश्विनी वायसे , सोनाली ठवरे, पल्लवी बनकर, धन्वंतरी पाटील, धनश्री तोडकर, सुरेखा कराळे, रेखा भगत, नंदिनी खोमणे, रुपाली डाखोरे, योगिता जामदार, सुषमा रायते, हीनाकौसर अत्तार, इंदुमती गायकवाड, मीना कानडे, रुपाली कोठावळे, अर्चना पोमणे, अनुराधा कुलकर्णी, नीलिमा झारगड, प्रज्ञा माने, मंजुषा शिंगाडे, नयना काळोखे, आशा पाटील सचिन रणमोडे यांनी विविध ठिकाणी योगाचे मार्गदर्शन केले.    



            

           

   

          


बाल कल्याण केंद्रामध्ये योग शिबीर संपन्न

जीवन विद्या योग आयुर्वेद फौंडेशन व बाल कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ चे औचित्य साधून बारामतीतील कसबा येथील बाल कल्याण केंद्र येथे दिनांक १८ जून २०२५ ते २१ जून २०२५ पर्यंत सकाळी ६.३० ते ७.३० वाजता  पाच दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ४० नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदविला.  


योग तज्ञ डॉ निलेश महाजन यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने या शिबिराचे आयोजन केले गेले. योग आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवितो. गरज आहे आपण नियमित , दीर्घ कालावधी पर्यंत सजगतेने योगाभ्यास करण्याची. आणि याच साठी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून आम्ही या शिबिराचे आयोजन केल्याची माहिती डॉ भक्ती महाजन यांनी दिली. 


योग आपल्या शरीराची ,मनाची ओळख आपल्याला करून देतो. अनेक व्याधी आपण याद्वारे नियंत्रित करू शकतो. योगासने करणे म्हणजे केवळ शरीर वाकविणे नसते , तर त्यावर नियंत्रण मिळविणे, सजगतेने त्याकडे पाहणे, श्वास नियम करणे या क्रियाचा सराव शरीराच्या सूक्ष्म भागावर परिणाम करणारा ठरतो, अनेक शारीरिक क्रीयांचे कार्य सुधारण्यास मदत करणारा ठरतो त्यामुळे सर्वांनी योगाभ्यास शिकणे आवश्यक असल्याचे मत बाल कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ अनिल मोकाशी यांनी यावेळी व्यक्त केले.      


योग दिनाच्या दिवशी बाल कल्याण केंद्राच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा योग सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी योग शिक्षिका डॉ श्वेता जाधव आणि रेखा नरके यांनी सुमारे १०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूक्ष्म व्यायाम , प्रार्थना, सर्व स्थितीतील योगासने, प्राणायाम , आणि ध्यान यांचे मार्गदर्शन यामध्ये करण्यात आले.    



कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी बाल कल्याण केंद्राचे अंकिता मोकाशी, गौतम मोकाशी, संदीप मुळीक, भुजबळ काका तसेच योग महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉ श्वेता जाधव , रेखा नरके, सुनंदा बागल, हीना अत्तार, पल्लवी बनकर, रेखा गेजगे, सिद्धी महाजन यांनी सहकार्य केले.   








योगशास्त्रात संशोधनाची आयुर्वेद विद्यार्थ्यांना संधी : डॉ निलेश महाजन

                                       

19 June 2025 : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात योग प्रात्यक्षिक व प्रबोधनपर व्याख्यनाचे आयोजन केले होते. सुमारे २०० पेक्षा अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. बारामतीतील आयुर्वेद व योग तज्ज्ञ डॉ निलेश महाजन  शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल काळे यांनी विद्यार्थ्यांना योग भविष्यातील संधी याविषयी मार्गदर्शन केले.    

                                       

 भारतीय योगशास्त्र जगाला दिलेली एक देणगी आहे , त्यातील क्रियांचा मानवी शरीरावर सकारत्मक परिणाम पाहावयास मिळतात. योगासने, प्राणायाम , शुद्धिक्रिया आणि ध्यान या क्रियांचे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणाम यावर संशोधन करण्यास खूप वाव आहे. आयुर्वेद व योग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. त्यामुळे आयुर्वेद शास्त्राचा वापर करीत असताना परिपूर्ण निरामय जीवनासाठी योग आत्मसाद करून रुग्णांना याचा फायदा मिळून देण्याची क्षमता आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे या क्रिया स्वतः करून त्यावर संशोधन करावे असे मत योग व आयुर्वेद तज्ञ डॉ निलेश महाजन यांनी व्यक्त केले. 


योगातील विविध क्रियांचा शरीरक्रियात्मक दृष्ट्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांची माहिती त्यांनी प्रात्यक्षिकांसह दिली. योगासन प्रात्यक्षिकामध्ये सूक्ष्म व्यायाम,  योगासने , प्राणायाम , ध्यान यांचे अनुभवजन्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. 

                                       

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ अर्चना इंचेकर (विभाग प्रमुख - शरीरक्रिया विज्ञान), डॉ सारिका अष्टेकर, डॉ श्रीनिवास बोबडे , डॉ सुरज भुंजे, डॉ क्षितीज गर्गे यांनी सहकार्य केले.  कार्यक्रमाला डॉ रफिक मुजावर, डॉ मनीषा पाटील, डॉ कल्याणी शेवाळकर, डॉ तबस्सुम पानसरे, डॉ अरविंद तुमराम,डॉ अंजुम शेख, डॉ विक्रांत इंगळे,डॉ प्रियांका केंगले,डॉ विजय पाटील उपस्थित होते.