पावसाळ्यातील चाळीशी नंतरच्या सांधेदुखी, पाठदुखी यासारख्या वात विकारांसाठी डॉ महाजन यांचे पंचकर्म उपचार

 


सध्या नेहमीच्या वेळेआधीच पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी ताप खोकला सुरु झाला आहे , पण त्यासोबत चाळीशी नंतर होणारे वात विकार जसे सांधे दुखी , मान दुखी , पाठ दुखी , मणक्यांचे आजार, शरीरावर येणारी सूज , गुडघेदुखी असे आजार वाढू लागले आहेत. यासाठी आयुर्वेदातील औषधी , पंचकर्म उपचार फायदेशीर ठरताना दिसत आहेत. बारामतीतील सुप्रसिद्ध डॉ निलेश महाजन यांच्या स्पाइन जॉईंट थेरपी मध्ये सांध्याला आयुर्वेदिक तेलाने मसाज केला जातो , औषधी काढ्याची वाफ दिली जाते आणि औषधी तेल किंवा काढे यांची बस्ती दिली जाते म्हणजेच याने शरीर शुद्धी होऊन , वात कमी होतो, स्नायूंना सांध्यांना बळकटी मिळते. आणि लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे असे लक्षणे आपणास असतील तर आपण त्वरित बारामतीतील डॉ निलेश महाजन यांच्या आयुर्वेद पंचकर्म सेंटर ला भेट द्यावी. १ महिन्याचा औषधांचे खर्च केवळ २८९९/- आणि ७ दिवसांचे पंचकर्म केवळ १९९९९/- मध्ये उपलब्ध आहेत. आणि एकदिवसीय मसाज/ वाफ केवळ ८९९/- मध्ये उपलब्ध आहे. त्वरित संपर्क करावा ९६६५८२३१०३. बारामतीतील कसबा आणि सूर्यनगरी मध्ये पंचकर्म उपचार होतात. डॉ निलेश महाजन यांची पंचकर्माची माहिती पुढील लिंक वर क्लिक करून जाणून घ्यावी  https://www.pranyoga.org/panchakarma 






आपल्याला आयुर्वेद , योग , निसर्गोपचार च्या आरोग्य क्षेत्रात करिअर करायचे आहे ? मग आपण हे कोर्सेस केलेच पाहिजेत

 

  भारत आणि विश्वामध्ये  योग,आयुर्वेद, निसर्गोपचार उपचार पद्धतीला मागणी वाढत आहे. या क्षेत्रात कार्य करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 101% रोजगाराच्या संधी असलेले विविध कोर्सेस तेही महाराष्ट्र सरकार आणि UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून करता येतात. बारामतीतील योग्य महाविद्यालय बारामती आपणासाठी खालील कोर्सेस चे दर्जेदार शिक्षण देणारे महाराष्ट्रातील नंबर एक चे महाविद्यालय आहे. आयुर्वेद, पंचकर्म , योग व निसर्गोपचार केंद्रामध्ये हे  कोर्सेस  केलेल्या मनुष्यबळाची सध्या नितांत आवश्यकता आहे. अगदी बारामती सारख्या ग्रामीण भागापासून ते पुण्या मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्येही याची मागणी आहे त्यामुळे आपण त्याची माहिती घेऊन प्रवेश निश्चित करावा.सध्या १५ जून २०२५ पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे  

प्रवेशासाठी संपर्क: 9665823103

योग, पंचकर्म व निसर्गोपचार महाविद्यालय, बारामती

१.डिप्लोमा इन योगा टीचर(1 वर्ष), पात्रता: 12 वी पास, शुल्क : 9100/-                

२.M.A. योगा(2 वर्ष), पात्रता: Any Graduate प्रवेश शुल्क: 18500/- प्रति वर्ष     

३. डिप्लोमा इन आयुर्वेदिक मसाज अँड पंचकर्म टेक्निशियन, 1 वर्ष, पात्रता: 12 वी पास, प्रवेश शुल्क: 20000/- 

४. डिप्लोमा इन आयुर्वेद पंचकर्म: 1 वर्ष , पात्रता: BAMS डॉक्टर/ वैद्य/इंटर्नशिप विद्यार्थी, शुल्क: 30000/- 

(BAMS नसलेल्यांसाठी कालावधी 2 वर्ष आणि शुल्क 30000/- प्रती वर्ष)          

योग महाविद्यालयाचे ब्रोशर, अभ्यासक्रम  आणि प्रवेश अर्जाच्या काही महत्वाच्या लिंक्स आहे त्यावरून अधिक माहिती करून घ्यावी                                                                                                                                        1) Information Brosher

https://www.pranyoga.org/brosher-for-courses 

2) Syllabus of Courses

https://www.pranyoga.org/syllabus

3) Apllication form for admissions

https://www.pranyoga.org/general-1


योग महाविद्यालयामध्ये आयुर्वेद , योग, निसर्गोपचार क्षेत्रात २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी पर्यंत अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स , प्रशिक्षक आहेत. आयुर्वेदातील पंचकर्म, योग चिकित्सा  व इतर उपचार पद्धतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळण्यासाठी उपचार केंद्र उपलब्ध आहे , जिथे आपणास प्रत्यक्ष  योग , पंचकर्म शिकता येणार आहे. प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि योगाचार्य डॉ निलेश महाजन हे या योग महाविद्यालयाचे संचालक आणि प्रधान चिकित्सक आहेत. त्यांच्या दूर दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आयुर्वेद, योग व निसर्गोपचाराची आवश्यकता ओळखून त्यांनी या कोर्सेस ची प्रशिक्षण संस्था सुरु केली आहे. 






योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांचे बाल योग संस्कार शिबिरात आरोग्य, अध्यात्म, भारतीय तत्वज्ञानाचे मार्गदर्शन

योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांचे बाल योग संस्कार शिबिरात आरोग्य, अध्यात्म, भारतीय तत्वज्ञानाचे मार्गदर्शन 

 उन्हाळी बाल योग संस्कार शिबिराची उत्साहात सांगता 

बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशनच्या मार्फत लहान मुलांसाठी दिनांक 2 मे ते 20मे पर्यंत आयोजित उन्हाळी बाल योग संस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला . जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित उन्हाळी शिबिरामध्ये एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी श्लोक पठण स्पर्धा, योगासन स्पर्धा घेण्यात आली. समारोप प्रसंगी शिबीर यशस्वी रित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एमआयडीसी बारामतीचे विभागीय आयुक्त हनुमंत पाटील, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, सुधीर पराडकर, प्रा अतुल भुजबळ  यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

                                        

 या शिबिरामध्ये विविध प्रगत योगासने, समंत्र सूर्यनमस्कार, मेंदूला चालना देण्यासाठीच्या यौगिक हालचाली,शंखवादन माहिती, विविध श्लोकपठण यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेबद्दल जागृती व्हावी व भाषा सहज बोलता यावी यासाठी संस्कृत संभाषण,  विविध मन्त्र , रामरक्षा पठण घेण्यात आले. योग महाविद्यालयाचे संचालक डॉ भक्ती महाजन , डॉ निलेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



आजच्या भौतिकवाद, चंगळवादाच्या युगामध्ये सर्वांचीच आणि विशेषता: तरुण वर्गाची आनंदाचा परिभाषा  बदलली आहे. त्यामुळे केवळ इंद्रिय तृप्ती, भौतिक गोष्टी मिळविण्यासाठीच प्रत्येकाची धडपड असते. त्यातूनच स्पर्धा, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, नैराश्य, तणाव, मानसिक समस्या निर्माण होत असते. त्यामुळेच लहान वयातच गुन्ह्यांचे प्रमाण आपणाला वाढलेले दिसते. लहान मुलांना जर आपण याबाबतची माहिती दिली, त्यांच्या शरीर, मन, इंद्रिये, बुद्धी यांचा साचेबद्ध ओळख करून दिली आणि आनंदाची संकल्पना हि केवळ भौतिक नसून, अध्यात्मिक पातळीवर हि आहे याची शिकवण दिली तर घर घरातून स्वामी विवेकानंद निर्माण होतील आणि समाज परिवर्तन घडेल. असे मत यावेळी आयुर्वेद व योग हॉस्पिटल चे प्रमुख डॉ निलेश महाजन यांनी व्यक्त केले.  

      आजचे मुले हे उद्याच्या भारताचे नागरिक आहेत. त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकास होणे सशक्त भारताच्या निर्माणसाठी आवश्यक आहे. या शिबिराच्या निमित्ताने त्यांच्या मध्ये आरोग्य विषयी, स्वतः मधील विविध गुणांविषयी, मानसिक व भावनिक जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही या शिबिराचे आयोजन आवश्यक आहे, असे मत हनुमंत पाटील यांनी व्यक्त केले. 

                                  

मुलांना शाळेतील अभ्यासा व्यतिरिक्तचे ज्ञान अध्यात्मिक पुस्तके, बोधकथा , महान पुरुषांचे चरित्र वाचन    यातून मिळविले पाहिजे. आम्ही मुलांना हे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक पालकांनी त्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. असे शिबिराच्या समन्वयक  डॉ भक्ती महाजन यांनी सांगितले.  

                                                          

   बारामती क्रीडा संकुल नेहमीच अशा चांगल्या विधायक कार्याला सहकार्य करीत असते. डॉ निलेश महाजन यांचा लहान मुलांवर संस्कार करण्याचा जो विचार आहे तो अगदी योग्य आहे. मनाचे संगोपन शिकविणे हि काळाची गरज आहे. असे मत तालुका क्रीडा अधिकारी श्री महेश चवले यांनी व्यक्त केले. 

                                            

 शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, अभिजित इंगुले , योग महाविद्यालायचे विद्यार्थी डॉ श्वेता जाधव, धनश्री तोडकर, सचिन रनमोडे, हिनाकौसर अत्तार, पल्लवी बनकर, सुनंदा बागल, अश्विनी वायसे, यांनी सहकार्य केले.