बारामतीत २ मे ते २० मे २०२५ पर्यंत बाल योग संस्कार शिबीराचे आयोजन

                            बारामतीत २ मे ते २० मे  २०२५ पर्यंत बाल योग संस्कार शिबीराचे आयोजन 

योगतज्ज्ञ निलेश महाजन देणार योग व भारतीय तत्वज्ञानाचे प्रशिक्षण 


बारामतीत बाल योग संस्कार शिबीराचे आयोजन 
योगतज्ज्ञ निलेश महाजन देणार योग व भारतीय तत्वज्ञानाचे प्रशिक्षण 

बारामतीतील आयुर्वेद व योग उपचार केंद्राचे प्रमुख डॉ निलेश महाजन यांच्या प्रेरणेने व जीवनविद्या योग्य आयुर्वेद फौंडेशन यांच्या माध्यमातून येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये २ मे ते २० मे  २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी ७. ३० ते ९ वाजेपर्यंत उन्हाळी बाल योग संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांना भारतीय तत्वज्ञान, योग, आयुर्वेद, अध्यात्माची ओळख व्हावी, आरोग्याविषयी जागरूकता वाढावी, शरीर, मन आणि अध्यात्मिक गोष्टी कळाव्यात यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याची माहिती तालुका क्रीडा अधिकारी श्री महेश चावले यांनी दिली . भगवत गीता,उपनिषद, योग, आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास असणारे प्रसिद्ध डॉ निलेश महाजन हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  या बाल योग संस्कार शिबिरामध्ये विविध योगासने, प्राणायाम,  मंत्रपठण, बोध कथा ,मेंदूची क्षमता विकसित करण्याचे व्यायाम, ध्यान , धारणा, अष्टांग योग याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुलांची प्रतिकार शक्ती, एकाग्रता, स्मरण शक्ती वाढविण्यासाठी, शारीरिक मानसिक सुदृढतेसाठी, कार्यक्षमता वाढीसाठी, उंची वाढण्यासाठी या प्रक्रियांचा उपयोग होणार आहे. प्रत्यक्ष सहभागी विद्यार्थ्याला विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी देणगी शुल्क ९९९ /- एवढे असणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी ९६६५८२३१०३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


डॉ निलेश महाजन प्रेरित आणि जीवनविद्या इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड आयुर्वेद संचालित

उन्हाळी योग संस्कार वर्ग (लहान मुलांसाठी)  (वय : 8 ते 16 वयापर्यंत)

या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या मुलांसाठी विशेष  योग संस्कार वर्ग

या योग वर्गामध्ये 
योगासने
सूर्यनमस्कार
श्लोक पठण
प्राणायाम
धारणा - ध्यान शिकविण्यात येणार आहे.

उपयुक्तता:
🧘🏻‍♂️लहान मुलांची प्रतिकार शक्ती एकाग्रता स्मरण शक्ती उंची वाढण्यासाठी 
🧘🏻‍♂️व्यक्तिमत्व विकासासाठी
🧘🏻‍♂️उच्चारण स्पष्ट होण्यासाठी
🧘🏻‍♂️स्वतः ची ओळख होण्यासाठी 
🧘🏻‍♀️बालकाच्या मानसिक व शारीरिक सुदृढतेसाठी 
🧘🏻‍♀️अष्टांग योगाचा परिपूर्ण अभ्यास 
 🧘🏻‍♀️धारणा ध्यान  पूर्व तयारी

वैशिष्ट्ये:
👉🏻योग वर्गासाठी प्रशस्त हॉल
👉🏻तज्ज्ञ प्रशिक्षक व मार्गदर्शक 
योग ही काळाची गरज आहे. 
👉🏻प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

कालावधी:  2 मे ते 20 मे 2025 पर्यंत

शुल्क :999/-

स्थळ : जिल्हा क्रीडा संकुल , देसाई इस्टेट ,बारामती

वेळ: सकाळी 7.30 ते 9.00 am

संपर्क :
प्रमुख मार्गदर्शक
डॉ निलेश महाजन
आयुर्वेद व योगोपचार तज्ज्ञ 
9665823103
डॉ भक्ती महाजन
आयुर्वेद व योगोपचार तज्ज्ञ



आयुर्वेद व योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांना PhD प्रदान

 

* आयुर्वेद व योगतज्ञ डॉ निलेश महाजन यांना PhD प्रदान *



बारामतीतील प्रसिद्ध आयुर्वेद व योगतज्ञ डॉ. निलेश महाजन यांना योगशास्त्र विषयात त्यांनी केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे , भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष श्री चमू कृष्ण शास्त्री व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ हरेराम त्रिपाठी त्यांच्या हस्ते पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे. 


'कोविड 19 च्या संसर्गा पश्चात निर्माण होणाऱ्या लक्षणांवर यौगिक क्रियांची परिणामकारकता- एक चिकित्सक अध्ययन' हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. नागपूर येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये हा शोध प्रबंध सादर केला होता. कैवल्यधाम लोणावळा येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ नीता विलास गाडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. 

गेल्या 100 वर्षांपासून योगशास्त्रात संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कैवल्यधाम या संशोधन केंद्रातून पीएच.डी पदवी प्राप्त करणारे ते पहिले विद्यार्थी ठरले आहेत. त्यासाठी सचिव ओ.पी. तिवारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. कोरोनाच्या काळामध्ये अनेक नागरिकांना मोफत योग प्रशिक्षण दिले होते, ज्याचा सकारात्मक फायदा झाल्याचे निरीक्षण अनेकांनी सांगितले होते. 



मार्गदर्शक डॉ नीता गाडे यांच्या प्रोत्साहन, त्यांचा योग तत्वज्ञानाचा अभ्यास आणि सोबत संशोधक दृष्टिकोन यामुळे शोध निबंध परिपूर्ण झाल्याचे डॉ निलेश महाजन यांनी नमूद केले. विद्यापीठातील योग विभागाचे अधिष्ठता डॉ कलापिनी अगस्ती, डॉ पराग जोशी, डॉ मधुसूदन पेन्ना यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. कैवल्यधाम संचालित गोर्धनदास सेकसेरिया योग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ बंदिता सतपथी, डॉ निधीशकुमार यादव , PhD समन्वयक श्री संजय शेटे सर यांचे सहकार्य लाभले.  बारामतीतील डॉ अंजली खाडे, डॉ भक्ती महाजन, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ अनिल काळे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. 
योगप्रसार, शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी योगाच्या प्रभावी उपयोगांवर संशोधनपर अभ्यास, आणि योग आयुर्वेद प्रशिक्षणात असलेल्या अनुभवामुळे ते या क्षेत्रातील मान्यताप्राप्त तज्ज्ञ आहेत. गेल्या 15 वर्षांपासून डॉ निलेश महाजन हे जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून योग व आयुर्वेद शास्त्राचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. अनेक कार्यशाळा व  योग शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी 40000 पेक्षा अधिक लोकांना योगाचे मार्गदर्शन केले आहे. सुमारे 500 हुन अधिक विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत जे योगशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत.  
लोकांनी आयुर्वेद व योग साधना आपल्या दैनंदिन वापरामध्ये ठेवावी यासाठी ते अनेकांना मार्गदर्शन करीत असतात. योग आयुर्वेदाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळण्यासाठी त्यांनी बारामतीमध्ये पहिल्या योग महाविद्यालयाची स्थापना केली आहे. ज्यामध्ये बारामती, महाराष्ट्र व पूर्ण भारतातून विद्यार्थी योगाचे शिक्षण घेत आहेत. 
योग आयुर्वेदातील विविध सेमिनार, कार्यशाळा यामध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक शोधपत्रिकांमध्ये त्यांचे शोध निबंध , तसेच मासिके ,वृत्तपत्रातून त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.
बारामती व पंचक्रोशीतील नागरिकांना शास्त्रोक्त आयुर्वेद व योग उपचार देण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शन व प्रयत्नातून लवकरच सुसज्ज असे निवासी आयुर्वेद,निसर्गोपचार व योग उपचार व संशोधन केंद्र कार्यान्वित होणार आहे.