बारामतीतील डॉ महाजन दाम्पत्यांना स्वातंत्र्य दिनाचे विशेष अतिथी म्हणून निमंत्रण

बारामतीतील डॉ महाजन दाम्पत्यांना स्वातंत्र्य दिनाचे विशेष अतिथी म्हणून निमंत्रण 


भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे बारामतीतील डॉ निलेश महाजन व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ भक्ती महाजन यांना दिल्लीमध्ये होणाऱ्या येत्या स्वातंत्र्यदिनीच्या समारंभामध्ये उपस्थित राहण्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. १३ तारखे पासून ते १७ तारखे पर्यंत त्यांना या समारंभामध्ये आमंत्रित केले आहे. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय  योग संस्थान, योग प्रमाणीकरण मंडळ याठिकाणी जाऊन ते थेतील कार्यपद्धतीचा,योगशिक्षणाच्या नवीन संकल्पनांचा अभ्यास करणार आहेत. आयुष मंत्रालयातर्फे दिल्लीमधील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्याचेही नियोजन असणार आहे.   

बारामती, पुणे शहरामध्ये  डॉ महाजन दाम्पत्य हे योग व आयुर्वेद प्रचार व प्रसाराचे कार्य करीत आहेत. उभय दाम्पत्यांनी बारामतीत योग महाविद्यालया स्थापना केली आहे, त्याद्वारे योगशास्त्राचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात येते. आयुर्वेद क्षेत्रातही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठीहि आयुर्वेदिक पंचकर्माचे कोर्से सुरु करून रोजगार निर्मिती साठी हातभार लावला आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध सरकारी, खाजगी संस्थांमध्ये योगशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.  विविध मोफत योगशिबिरांच्या माध्यमातून उभय दाम्पत्य सामाजिक भान जपून सेवा देत आहेत. योगशास्त्रात संशोधन व नाविन्यपूर्ण संकल्पनेतुन विविध कार्यक्रमाद्वारे समाज प्रबोधनाचे, तसेच आरोग्या विषयी जनजागृतीचे कार्य सुरु आहे.  आयुष मंत्रालयाच्या योग प्रमाणीकरण मंडळातर्फे त्यांच्या संस्थेला मान्यता मिळाली आहे. बारामतीसारख्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे मान्यता मिळवणारी त्यांची हि पहिली संस्था आहे. विविध मान्यता प्राप्त पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. उभयतांच्या योग क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन आयुष मंत्रालयातर्फे त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. 

डॉ निलेश महाजन यांना उत्कृष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार

 डॉ निलेश महाजन यांना उत्कृष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार( Bacth 2001-2002)


        बारामतीतील आयुर्वेद व योग तज्ञ डॉ निलेश महाजन यांना नुकतेच उत्कृष्ट माजी विद्यार्थी या पुरस्काराने महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या सुमतिभाई शहा आयुर्वेद महाविद्यालय हडपसर यांच्या वतीने  सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक, संशोधन, नाविन्यपूर्ण कामाचा आढावा घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

हडपसर येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव मा अनिल गुजर, सहसचिव मा अरुण गुजर, भारती विद्यापीठ आयुर्वेद कॉलेज चे प्राचार्य डॉ शैलेश देशपांडे यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ सचिन कुमार पाटील,उपप्राचार्य डॉ विवेक चौधरी, डॉ नितेश जोशी,  शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मानपत्र, शाल आणि पुणेरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 


डॉ निलेश महाजन हे आयुर्वेद व योग क्षेत्रात संशोधन, विविध सामाजिक उपक्रम व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. त्यामुळे हजारो नागरिकांना आरोग्यासाठी त्याचा लाभ होत आहे.  बारामती मध्ये पहिल्या  महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली आहे. यामाध्यमातून योग आयुर्वेद शाश्त्राचा प्रचार आणि प्रसार करीत असतात. ५०० हुन अधिक विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयात योग व आयुर्वेदाचे धडे घेत आहेत. अनेक विद्यार्थी योग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी देखील मिळाल्या आहेत. सुमारे ४०००० नागरिकांना त्यांनी योगाचे प्रशिक्षण दिले आहे. आयुष मंत्रालयाच्या योग प्रमाणीकरण मंडळातर्फे त्यांच्या संस्थेला प्रमाणित योग संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.  


पुण्यातील डॉ सुधांशु ताकवले (Batch 2002-2003), डॉ नेहा गाडगीळ(Batch 2003-2004) यांनाही यावेळी उत्कृष्ट माजी विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.